दारु पिल्यानंतर दुसऱ्या दिवशी हँगओव्हर का होतो? 99 टक्के लोकांना माहिती नाही नेमके कारण!

मद्यप्राशन केल्यावर दुसऱ्या दिवशी अनेकांना हँगओव्हर होतो. अनेकांचे डोके दुखायला लागते. परंतु असे नेमके का होते? हे अनेकांना माहिती नाही. हँगओव्हर होण्यामागची कारणे जाणून घ्या..

| Updated on: Feb 14, 2026 | 7:51 PM
1 / 5
मद्य हे आरोग्यास हानिकारक असते. परंतु तरीदेखील तरुणांपासून ते साठीमध्ये गेलेल्या व्यक्तीपर्यंत मद्यप्राशन करणाऱ्यांची संख्या लक्षावधी आहे. एकदा मद्यप्राशन करायला सुरुवात केली की त्याची सवय लागते. त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. म्हणूनच मद्यप्राशन करू नये असे सांगितले जाते.

2 / 5

तुमच्या अवतीभोवती वेगवेगळ्या प्रकारचे मद्य पिणाऱ्या व्यक्ती सापडतील. यातील काही लोक तर एवढं मद्य पितात की दुसऱ्या दिवशी त्यांना हँगओव्हर होतो. डोकं दुखायलाल लागतं, गरगरायला लागतं. हे असं नेमकं का होतं? ते जाणून घेऊ या...

3 / 5

मद्यामध्ये असलेले अल्कोहोल हे शरीरात डायुरेटिक म्हणून काम करते. म्हणजेच मद्यप्राशन केल्यानंतर तुमचे मूत्रपिंड नेहमीपेक्षा जास्त लघवी तयार करते. परिणामी मद्यप्राशन केलेल्या व्यक्तीच्या शरीरातील सोडीयम, पोटॅशियम असे गरजेचे इलेक्ट्रोलाईट्स कमी होतात.

4 / 5

याच प्रक्रियेमुळे दारू उतरल्यानंतर दुसऱ्या दिवशी डोकं दुखायला लागतं. तसेच चक्करही येते. काही लोकांचा तर चेहरा सुजून जातो. जास्त तहान लागते. यालाच आपण हँगओव्हर म्हणतो. म्हणूनच मद्यप्राशन टाळावे असे म्हटले जाते.

5 / 5

(टीप- मद्यप्राशन आरोग्यास हानिकारक असते. मद्यप्राशन करू नये. मद्यप्राशनाला प्रोत्साहित करणे हा या स्टोरीमागचा उद्देश नाही.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us