रेल्वेमध्ये M1, M2, M3 डब्यांचा काय अर्थ असतो, गोंधळ उडत असेल तर हे वाचाच!
या प्रत्येक डब्यांच्या नावाचा वेगवेगळा अर्थ असतो. S1, B1, A1, D1 अशी नावे तुम्ही रेल्वेच्या डब्यावर वाचली असतीलच. परंतु रेल्वेच्या काही डब्यांना M1, M2 किंवा M3 अशीही नावे दिलेली असतात. M1, M2 किंवा M3 याचा नेमका अर्थ अनेकांना माहिती नसतो.

भारतात रोज कोट्यवधी लोक रेल्वेने प्रवास करतात. हजारो ट्रेन रोज भारतभरात धावतात. देशभरात कोट्यवधी प्रवासी सुखरुप आपल्या घरी पोहोचावेत त्यासाठी रेल्वे विभागाकडून नियमांचे कठोरपणे पालन केले जाते. भारतीय रेल्वेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डबे असतात. या डब्यांना वेगवेगळी नावे दिलेली असतात.

या प्रत्येक डब्यांच्या नावाचा वेगवेगळा अर्थ असतो. S1, B1, A1, D1 अशी नावे तुम्ही रेल्वेच्या डब्यावर वाचली असतीलच. परंतु रेल्वेच्या काही डब्यांना M1, M2 किंवा M3 अशीही नावे दिलेली असतात. M1, M2 किंवा M3 याचा नेमका अर्थ अनेकांना माहिती नसतो. म्हणूनच या नावांचा अर्थ समजून घेऊ या..

भारतीय रेल्वेमध्ये M1 हा डबा 2021 साली सुरू करण्यात आला. या डब्याला 3E (AC Three Tier Economy) असेही म्हटले जाते. हा डबा थर्ड एसी (3A) या डब्यापेक्षा थोडा वेगळा असतो. एम 1 डब्यात बर्थची संख्या जास्त असते.

एम 1, एम 2 आणि एम 3 डब्यामध्ये साधारण 83 कोच असू शकतात. स्टँडर्ड थर्ड एसीमध्ये साधारण 64 ते 72 कोच असतात. रेल्वेच्या डब्यांवर M1, M2 किंवा M3 असे लिहिलेले असेल तर हे डबे थर्ड एसी एकोनॉमी क्लासचे डबे आहेत, असे समजावे.

या डब्यांमधील सिटची किंमत ही थर्ड एसीपेक्षा 6 ते 8 टक्क्यांनी कमी असते. कमी पैशात एसीमध्ये तुम्हाला प्रवास करायचा असेल तर हे डबे तुमच्यासाठी चांगला पर्याय आहेत. या डब्यातील सिटवर जाहादेखील थोडी कमी असते.