AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या पार्टीबाबत मोठा दावा

‘कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील’ 6 दिवसांपूर्वी स्थापन झालेल्या पार्टीबाबत मोठा दावा

| Updated on: May 21, 2026 | 5:18 PM
Share

महाराष्ट्रातील तरुण अभिजीत दीपके सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या “कॉक्रोच जनता पार्टी” या अनोख्या सोशल मीडिया मोहिमेमुळे इंटरनेटवर मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या इंस्टाग्राम पेजला अवघ्या पाच दिवसांत 10 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत.

महाराष्ट्रातील तरुण अभिजीत दीपके सध्या सोशल मीडियावर मोठ्या चर्चेत आले आहेत. त्यांनी सुरू केलेल्या “कॉक्रोच जनता पार्टी” या अनोख्या सोशल मीडिया मोहिमेमुळे इंटरनेटवर मोठी खळबळ उडाली आहे. काही दिवसांपूर्वी सुरू झालेल्या या इंस्टाग्राम पेजला अवघ्या पाच दिवसांत 10 मिलियनपेक्षा अधिक फॉलोअर्स मिळाले आहेत. त्यामुळे अभिजीत दीपके यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

कॉक्रोच जनता पार्टीच्या माध्यमातून अभिजीत यांनी बेरोजगारी, सरकारी व्यवस्था आणि तरुणांच्या समस्यांवर विनोदी मिम्सच्या माध्यमातून भाष्य केले आहे. त्यांच्या पोस्ट तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेक जण या मोहिमेला पाठिंबा देताना दिसत आहेत.

या संदर्भात अभिजीत दीपके यांच्या काका विकास दिपके यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्रात कॉक्रोच जनता पार्टीचे 10 ते 15 आमदार निवडून येऊ शकतात. तसेच राज्यातील तरुण वर्ग या मोहिमेच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टी हा चर्चेचा मोठा विषय बनला आहे.

Published on: May 21, 2026 05:18 PM
Follow Us