AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; काय घडलं?

लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; काय घडलं?

| Updated on: May 21, 2026 | 5:58 PM
Share

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. वारकरी संप्रदायात घुसखोरी झालेली आहे, असे म्हणत लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी काही वारकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामुळेच त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक करण्यात आली होती.

शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते तथा प्रवक्ते गेल्या काही दिवसांपासून चांगलेच चर्चेत आहेत. वारकरी संप्रदायात घुसखोरी झालेली आहे, असे म्हणत लवांडे यांनी काही दिवसांपूर्वी काही वारकऱ्यांची यादी प्रसिद्ध केली होती. त्यामुळेच त्यांच्यावर काही दिवसांपूर्वी शाईफेक करण्यात आली होती. या शाईफेकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. तर या घटनेनंतर शरद पवार यांच्या पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी लवांडे यांचा दुग्धाभिषेक केला होता. दरम्यान, हे प्रकरण मागे पडलेले असतानाच आता लवांडे यांना वाघोली पोलिसांनी अटक केली असल्याचं सांगितलं जात होतं.

महत्त्वाची बाब म्हणजे, लवांडेंना अटक वगैरे करण्यात आलेली नसून, फक्त जबाब नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला नेण्यात आलं होतं. या ठिकाणी रोहित पवार आणि शशिकांत शिंदेदेखील पोहोचले. यावेळी अनेक राष्ट्रवादी नेत्यानी ट्वीट करत नराजी व्यक्त केली. तर स्वतः विकास लवांडे यांनी सांगितलं ‘चोर समजून संन्याश्याला फाशी’. या प्रकरणात पुढे काय घडणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Published on: May 21, 2026 05:55 PM
Follow Us