वंदेभारत एक्सप्रेसमध्ये ‘डेंटल एज’ जाणून घ्या, सेन्सोडाईन आणि टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
गेल्या काही वर्षापासून देशात'डेंटल एज' बाबत जागृती निर्माण झाली आहे. तुमच्या खऱ्याखुऱ्या वयापेक्षा तुमची 'डेंटल एज' अधिक असू शकते, हे तुम्हाला माहिती आहे का? त्यामुळेच सत्य जाणून घेण्याची हीच ती वेळ आहे. 'वंदे भारत एक्सप्रेस'मध्ये तुम्ही तुमची 'डेंटल एज' जाणून घेऊ शकता. तशी संधीच तुम्हाला सेन्सोडाईन आणि टीव्ही 9 नेटवर्कने निर्माण करून दिली आहे. तुमचे दात स्कॅन करा आणि उत्तम ओरल हेल्थसाठी पहिलं पाऊल टाका...
सेन्सोडाईन आणि टीव्ही 9 नेटवर्कने दातांच्या आरोग्या संदर्भात जागृती करण्यासाठी आता भारतीय रेल्वेच्या मुंबई ते सोलापूर वंदेभारत एक्सप्रेसमध्ये अनोखा उपक्रम सुरु केला आहे. त्यात तुम्हाला तुमच्या डेंटल एजची माहिती करुन घेता येणार आहे. तुमच्या शारीरिक वया पेक्षा तुमचे डेंटल एज कदाचित जास्त असू शकते. त्यामुळे ही तपासणी खूप महत्वाची आहे. वंदेभारत एक्सप्रेसच्या मुंबई ते सोलापूर प्रवासात प्रवाशांनी मोबाईल एका क्युआर कोडला स्कॅन करुन त्यांची डेंटल एज जाणून घेतली. नवी दिल्लीत वर्ल्ड ओरल हेल्थ डेच्या निमित्ताने केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्य मंत्री अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते know your dental age and take the first step for oral health या उपक्रमाची सुरुवात झाली.
Published on: May 21, 2026 08:26 PM
नाशिक IT कंपनी धर्मांतरण प्रकरणी मोठी अपडेट समोर! मुख्य संशयित आरोपी..
मोठी राजकीय घडामोडी! शरद पवार आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची...
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर मोठी वाहतूक कोंडी, वाहतूक मंदावल्याने
पंचगंगा नदीचं महारौद्ररुप! पाणीपातळी थेट 34 फुटांपर्यंत, डोळे विस्फारण

