
विराट कोहलीला आज नव्या ओळखीची गरज नाही. भारतीय क्रिकेट संघातील तो एक स्टार क्रिकेटपटू आहे. आज त्याच्या पायाशी श्रीमंती लोळण घेते. आज तो शेकडो कोटी रुपयांचा मालक आहे, असे म्हटले जाते.

विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का कोहली आज एकदम आलिशान घरात राहतात. विराट कोहलीचे गुरुग्राम इथे एक आलिशान आणि सर्व सोईसुविधांनी युक्त असे एक घर आहे.

मुंबईच्या वरळी येथेही त्याचे एक अपार्टमेंट आहे. आज या अपार्टमेंटची किंमत कोट्यवधी रुपये आहे. यासह त्याचे अलिबागमध्ये एक मोठे आणि आलिशान असे फार्महाऊस आहे. या फार्महाऊसची नेहमीच चर्चा असते.

धाकधकीच्या जीवनात निवांत वेळ घालवण्यासाठी विराट कोहलीने अलिबागमध्ये हे फार्महाऊस बांधलेले आहे. त्यांनी 2022 साली अलिबागमध्ये एक जमीन खरेदी केली होती. ही एकूण 8 एकर जमीन होती.

आता याच जागेवर त्याने फार्महाऊस उभे केले आहे. आज या फार्महाऊसची किंमत कित्येक कोटी रुपयांत आहे.

कोहलीच्या या फार्महाऊसमध्ये स्वीमिंग पूल आहे. सोबतच इतरही सर्व सोई सुविधा आहेत. विराटने या घराचे डिझाईनदेखील अगदी युनिक असे केलेल आहे. या घरासाठी त्याने पांढऱ्या रंगाचा वापर केलेला आहेत. अगदी आलिशान वाटावे असे विराटचे फार्महाऊस आहे.