Beer Bottle Price : 1000 रुपयांच्या बिअरच्या बॉटलची खरी किंमत काय? आकडा वाचून बसेल धक्का!
भारतात प्रत्येक राज्यात एकाच मद्याच्या बॉटलची किंमत वेगवेगळी असू शकते. तुम्ही जर एखादी बॉटल 1000 रुपयांना खरेदी करत असाल तर त्यातील बरीच मोठी रक्कम ही थेट सरकारी खजिन्यात जाते.

भारतात मद्यविक्रीची बाजारपेठ खूप मोठी आहे. येथे रोज शेकडो कोटी रुपयांच्या दारुची विक्री होते. वेगवेगळ्या राज्यांना मद्यविक्रीतून मोठा महसूल मिळतो. त्यामुळेच राज्यांच्या महसुलाचा हा चांगला स्त्रोत आहे.

भारतात प्रत्येक राज्यात एकाच मद्याच्या बॉटलची किंमत वेगवेगळी असू शकते. तुम्ही जर एखादी बॉटल 1000 रुपयांना खरेदी करत असाल तर त्यातील बरीच मोठी रक्कम ही थेट सरकारी खजिन्यात जाते. त्यामुळे तुम्ही जर 1000 रुपयांचे मद्य खरेदी केले तर त्यावर कर किती आकारला जातो, ते जाणून घेऊ या..

भारतात 1000 रुपयांच्या एका बॉटलवर वेगवेगळ्या राज्यांत साधारण 350 ते 700 रुपयांपर्यंत कर आकारला जाऊ शकतो. कारण मद्यविक्री ही जीएसटीच्या कक्षेत येत नाही. भारतातील वेगवेगळी राज्ये आपल्या धोरणानुसार मद्यावर कर आकारतात.

तुम्ही 1000 रुपयांची मद्याची बॉटल कर्नाटकात खरेदी करत असाल तर त्यावर 70 ते 80 टक्के कर आकारला जातो. उत्तर प्रदेशात कर आकारणीचे हे प्रमाण 69 टक्के आहे. दिल्ली आणि तामिळनाडूत मद्यावर साधारण 65 ते 70 टक्के कर आकारला जातो.

महाराष्ट्रात 1000 रुपयांच्या बॉटलवर 45 ते 71 टक्के कर आकारला जातो. गोव्यात सर्वाधिक कमी 22 ते 55 टक्के कर आकरला जातो. म्हणूनच गोव्यात मद्याची किंमत कमी असते.