शेकडो वर्षापासून दडलं होतं दगडांचं सिक्रेट, किर्र जंगलात पोहोचताच सगळे चकित; डोळ्यांनाही विश्वास बसेना!

कोस्टा रिकामधील जंगलांमध्ये शेकडो वर्षांपासून एक रहस्य लपलेले होते. हे रहस्य समोर आल्यानंतर संपूर्ण जग चकित झाले. या जंगलात असंख्य गोलाकार दगड आढळले होते. यातील काही दगड आकाराने काही इंचांचे, तर काही अनेक फूट व्यासाचे आहेत.

| Updated on: Oct 11, 2026 | 8:46 PM
1 / 5
या पृथ्वीवर अनेक अजब गजब रहस्ये आहेत. आतापर्यंत अशा काही गोष्टी आढळलेल्या आहेत, त्यावर संशोधक गेल्या बऱ्याच वर्षांपासून अभ्यास करत आहेत. परंतु काही गोष्टींचे रहस्य अद्याप गूढच आहे. (फोटो सौजन्य- एक्स)

या पृथ्वीवर अनेक अजब गजब रहस्ये आहेत. आतापर्यंत अशा काही गोष्टी आढळलेल्या आहेत, त्यावर संशोधक गेल्या बऱ्याच वर्षांपासून अभ्यास करत आहेत. परंतु काही गोष्टींचे रहस्य अद्याप गूढच आहे. (फोटो सौजन्य- एक्स)

2 / 5

कोस्टा रिकामधील जंगलांमध्ये शेकडो वर्षांपासून एक रहस्य लपलेले होते. हे रहस्य समोर आल्यानंतर संपूर्ण जग चकित झाले. या जंगलात असंख्य गोलाकार दगड आढळले होते. यातील काही दगड आकाराने काही इंचांचे, तर काही अनेक फूट व्यासाचे आहेत. (फोटो सौजन्य- एक्स)

3 / 5

काही महाकाय दगडांचे वजन अनेक टन असल्याचेही समोर आले आहे. हे दगड अत्यंत कठीण अशा ‘गॅब्रो’ या ज्वालामुखीय खडकापासून घडवण्यात आले आहेत. (फोटो सौजन्य- एक्स)

4 / 5

पुरातत्त्व संशोधकांच्या मते या दगडांची निर्मिती डिक्विस संस्कृतीतील लोकांनी केली होती. साधारण 700 ते 1535 या काळात हे गोलाकार दगड तयार करण्यात आले. प्राचीन संस्कृतीचा ऱ्हास झाल्यानंतर लोकांनी हा परिसर सोडला आणि तिथे घनदाट जंगल वाढले. (फोटो सौजन्य- एक्स)

5 / 5

दरम्यान, हे गोलाकार दगड समोर आल्यानंतर त्यांचा संबंध एलियन्स आणि खजान्याशी जोडण्यात आला. अनेक तर्कवितर्क लावण्यात आले. या दगडांच्या आत सोने लपवले असल्याचा दावाही कधीकाळी करण्यात आला होता. सोन्याच्या लालसेतून अनेक दगड फोडून टाकण्यात आले. परंतु नंतर त्या दगडांमध्ये काहीही नसल्याचे समोर आले. (फोटो सौजन्य- एक्स)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us