AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rain Update : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा परतणार, दसऱ्यानंतर या तारखेपासून…पंजाबराव डख यांनी जिल्ह्यांची यादीच दिली!

परताची एक पाऊस मात्र येणार आहे. दसऱ्याासून हा पाऊस असेल.काही भागात हा पाऊस जास्त असेल, काही ठिकाणी रिमझिम पाऊस असेल. काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर येईल. 13 नोव्हेंबर रोजी थंडीला सुरुवात होईल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले.

Rain Update : महाराष्ट्रात पाऊस पुन्हा परतणार, दसऱ्यानंतर या तारखेपासून...पंजाबराव डख यांनी जिल्ह्यांची यादीच दिली!
panjabrao dakh and rain updateImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 11, 2026 | 9:53 PM
Share

Maharashtra Rain Update : सध्या राज्यात पावसाने दडी मारलीय. शेतकऱ्यांच्या हातातून खरीप हंगाम गेलाय. पाऊस नसल्याने मराठवाडा, विदर्भात विहिरी कोरड्या पडल्या आहेत. राज्य सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर केलाय. त्यानुसार शेतकऱ्यांना मदत केली जात आहे. दरम्यान, खरीब हंगाम शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला असला तरीही रबी हंगाम अद्याप बाकी आहे. रबी हंगामाच्या पेरण्या होण्यासाठी तरी राज्यात पाऊस यावा, अशी आशा शेतकरी लावून बसले आहेत. असे असतानाच आता हवामानाची माहिती देणारे पंजाबराव डख यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. दसऱ्यानंतर राज्यात पाऊस येऊ शकतो, असा अंदाज त्यांनी व्यक्त केलाय.

परतीचा हा पाऊस निर्णायक असेल

राज्यात परतीचा पाऊस येणार आहे. हा पाऊस शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा असेल. एकूण चार दिवस दिवस हा पाऊस असेल. 21 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबरपर्यंत पासवाचा राज्यात मुक्काम असेल. या काळात रोज राज्यातील वेगवेगळ्या भागात पाऊस पडेल. परतीचा पाऊस येणार आहे. त्यामुळे रब्बीच्या पेरण्या होतील. परतीचा हा पाऊस निर्णायक असेल, असं डख यांनी सांगितलंय.

कोणकोणत्या जिल्ह्यातं येणार पाऊस

बंगालची खाडी तसेच अरबी समुद्रात तापमान वाढल्याने बाष्प तयार होईल. याच बाष्पामुळे परतीचा पाऊस येईल. हा पाऊस सोलापूर जिल्हा, सांगली, कोल्हापूर, पुणे, सातारा, अहिल्यानगर, बीड, लातूर, धाराशीव, नांदेड, हिंगोली, परभणी, यवतमाळ, वाशीम या जिल्ह्यात 21 ते 24 या काळात पावसाला सुरुवात होईल. नंतर हा पाऊस पुढे सरकेल. पुढे सरकत हा पाऊस जळगाव, धुळे, नंदूरबार, अकोला, अमरावती पर्यंत जाईल. हा पाऊस तेलंगाना, कर्नाटकहून येईल, असे पंजाबराव डख यांनी सांगितले.

13 नोव्हेंबर रोजी थंडीला सुरुवात होईल

परताची एक पाऊस मात्र येणार आहे. दसऱ्याासून हा पाऊस असेल.काही भागात हा पाऊस जास्त असेल, काही ठिकाणी रिमझिम पाऊस असेल. काही ठिकाणी शेतातून पाणी बाहेर येईल. 13 नोव्हेंबर रोजी थंडीला सुरुवात होईल. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यातही थोडाफार पाऊस असेल. परतीचा पाऊस रब्बी पेरणीसाठी निर्णायक असेल, असा अंदाज पंजाबराव डख यांनी व्यक्त केला.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ