ज्वालामुखीच्या पाण्यापासून तयार होते ही खास व्हिस्की, तब्बल 400 वर्षांपासून अजूनही तशीच चव; विशेषता काय?

या जगात एक खास व्हिस्की आहे. या व्हिस्कीचे नाव बशमिल्स असे आहे. सर्वात जुने लायसन्स असलेली ही व्हिस्की असल्याचे मानले जाते. कारण या व्हिस्कीची डिस्टिलेरी 400 वर्षांपेक्षा जास्त काळापासून कार्यरत आहे.

| Updated on: Jun 24, 2026 | 9:48 PM
1 / 5
भारतासह या जगात मद्यावर प्रेम असणाऱ्यांची संख्या बरीच आहे. शेकडो वर्षांपासून मानवी संस्कृतीत मद्याला एक वेगळे स्थान आहे. म्हणूनच मद्यनिर्मितीचा इतिहासही तेवढाच जुना आहे. आजकाल मद्याचे अनेक प्रकार आहेत.

2 / 5

या जगात एक खास व्हिस्की आहे. या व्हिस्कीचे नाव बशमिल्स असे आहे. सर्वात जुने लायसन्स असलेली ही व्हिस्की असल्याचे मानले जाते. कारण या व्हिस्कीची डिस्टिलेरी 400 वर्षांपेक्षा जास्त काळापासून कार्यरत आहे.

3 / 5

या व्हिस्कीची सर्वात खास बाब म्हणजे ती तयार करण्यासाठी ज्वालामुखींपासून तयार झालेल्या पर्वातातून जे पाणी येते त्याचा उपयोग केला जातो. त्यामुळेच या व्हिस्कीची चव खूपच वेगळी असते. बशमिल्स या व्हिस्कीचा इतिहास उत्तर आयलँडमधील बशमिल्स या छोट्याशा गावापासून सुरु होतो.

4 / 5

20 एप्रिल 1608 रोजी इंग्लंडचा राजा जेम्स प्रथम यांनी त्या भागातील जमीनदार सर थॉमस फिलिप्स यांना मद्य तयार करण्यासाठी शाही परवाना दिला. तेव्हापासून ही व्हिस्की आजदेखील तयार केली जाते. बशमिल्स व्हिस्कीसाठी बश नदीचे पाणी वापरले जाते. ही नदी ज्वालामुखीच्या पर्वतातून वाहते.

5 / 5

नदी ज्वालामुखीतून आल्याने नदीतील पाण्यात वेगवेगळी खनिजे मिसळतात. तुम्ही बशमिल्स ही व्हिस्की पिल्यावर त्याची प्रचितीही तुम्हाला येईल. म्हणूनच ही जगातील सर्वात स्मुथ व्हिस्की आहे, असे मानले जाते. (टीप- या लेखातील सर्व माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. सविस्तर माहितीसाठी किंवा कोणताही प्रयोग करण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधावा)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us