Internet ते काय असतं बुवा? या देशात इंटरनेटच नाही, मग इतर देशाशी कसा होतो संपर्क?

Country without Internet: जगातील असाही एक देश आहे जिथे इंटरनेट पोहचलेले नाही. मग या देशातील नागरिकांना जगातील अपडेट कशा कळतात? त्यांना जगाशी कसा संपर्क असतो, जाणून घ्या.

| Updated on: Feb 04, 2026 | 4:27 PM
1 / 6
Country Without Internet: जगभरता इंटरनेटची महत्त्वाची क्रांती झाली. जग अजून जवळ आले. व्हिडिओ कॉल, इस्टंट मॅसेज, हायस्पीड इंटरनेटमुळे अनेक गोष्टी सहज साध्य झाल्या. भारतातही दुर्गम भागात इंटरनेट पोहचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण जगातील या देशात सध्या इंटरनेट नाही. मग येथील लोक एकमेकांशी कशी संपर्कात असतात.

2 / 6
इरिट्रिया हा जगातील एकमात्र असा देश आहे. जिथे सर्वसामान्य नागरिकांसाठी  3G, 4G वा 5G सारखी मोबाईल डेटा सेवा नाही. मोबाईल फोन केवळ बेसिक व्हाईस कॉल वा एसएमएसपर्यंतच मर्यादीत आहे. इथं इंटरनेट हा शब्दच अनेकांच्या गावी नाही.

3 / 6
इंटरनेट एक्सेस हा काही सरकारच्या अख्त्यारीतील इंटरनेट कॅफे पुरताच मर्यादित आहे. हे कॅफे केवळ राजधानीतच उपलब्ध आहेत. या कॅफेत इंटरनेट स्पीडही अत्यंत संथ आहे. या ठिकाणी, कॅफेत जर तुम्ही एक तास इंटरनेटचा वापर केला तर काम होईल की नाही ते माहिती नाही पण तुम्हाला 100 रुपये खर्च करावे लागतील.

4 / 6
इरिट्रिया सरकारचे दूरसंचार खाते हे इंटरनेट आणि दूरसंवादावर नियंत्रण ठेवते. युझर्सला कॅफेत इंटरनेटचा वापर करण्यासाठी अधिकृत ओळखपत्र दाखवावे लागते. सरकार ऑनलाईनवर बारीक लक्ष ठेवून आहे. इथं कोणत्याही प्रकारचा उठाव होऊ नये यासाठी सरकारचे कडक नियम आहेत.

5 / 6
इंटरनेट कॅफेवरूनच इंटरनेट आधारीत कॉलिंगचा वापर करून येथील नागरिक हे परदेशातील त्यांच्या नातेवाईकांशी संपर्कात राहतात. पण त्यासाठी त्यांना मोठी वाट पाहावी लागते. इंटरनेटची गती अत्यंत संथ असल्याने त्यांचा योग्य संपर्कही होत नाही.

6 / 6
असे असले तरी परदेशी बातम्या पाहण्यासाठी नागरीक सॅटेलाईट टेलिव्हजनचा वापर करतात. अर्थात या सर्व प्रक्रियेवर सरकारचे नियंत्रण आहे. त्यामुळे सर्वच चॅनल्स, वाहिन्या दिसत नाहीत. सरकारच्या अनुकूल इथं धोरण राबवली जातात.