
भारतामध्ये सापांच्या हजारो जाती आढळून येतात, मात्र त्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच विषारी जाती आहेत. यामध्ये साप, मण्यार, घोणस आणि फुरसे या जातींचा समावेश होतो. या सापांच्या जातीला बिग फोर असे देखील म्हणतात. त्यातीलच एक नाग या सापाच्या प्रजातीबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. नागाबद्दल समाजात आजही अनेक गैरसमज आहेत.

नाग हा सापांच्या जेवढ्या प्रजाती भारतामध्ये आहेत, त्यातील सर्वात चपळ प्रजात आहे. नागाचं स्पीड हे प्रति सेंकद 3.3 मीटर एवढं प्रचंड असतं. डोळ्याची पापणी लवत नाही तोच तो एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाऊ शकतो.

नगाबाबत सर्वात मोठा गैरसमज आहे, तो म्हणजे तो व्यक्तीचा पाठलाग करतो. मात्र सत्य तर हे आहे की नाग कधीच व्यक्तीचा पाठलाग करत नाही. तो मानवांपासून कायम दूर राहातो. मात्र त्याला धोका जाणवल्यास तो आक्रमक होतो, त्याला पुढे निघून जायचं असतं. मात्र तो आपला पाठलाग करत आहे, असा त्यावेळी तुम्हाला भास होतो.

नाग हा स्वत:हून कधीच तुमच्यावर हल्ला करत नाही, नाग फक्त दोन परिस्थितीमध्ये तुमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकतो. एक तर तुमच्यापासून त्याला धोक्याची जाणीव झाली तर आणि दुसर्या परिस्थितीमध्ये ही आपली शिकार आहे, असा त्याचा भास झाला तर आणि तरच तो चावा घेतो.

रस्ता कसा जरी असला कितीही ओबड-खाबड असला. दगडं असले तरी तो त्याच गतीने सरपटतो. नागाचं स्पीड हे सापाच्या इतर प्रजातीमधील सापांपेक्षा जास्त असते.

नाग हा त्याच्या फण्यामुळे इतर प्रजातीच्या सांपापेक्षा वेगळा ठरतो, तो लगेच ओळखू येतो. नाग हा अतिशय विषारी साप असतो, तसेच चपळ असतो. त्यामुळे त्याला चुकूनही पकडण्याचा प्रयत्न करू नका. त्याची माहिती तुमच्या परिसरातील सर्पमित्रांना द्या.

तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल साप, पाण्यामध्ये देखील उत्तम पोहतो. जमिनीवर तो जेवढा चपळ असतो, तेवढाच तो पाण्यात देखील चपळ असतो. त्यामुळे नागच काय तर कोणताही साप तुम्हाला दिसला तर त्याला न मारता, त्यांची माहिती सर्पमित्रांना द्या. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)