
भारतासोबत शत्रूत्व घेणारा पाकिस्तान अनेक बाजूंनी अडचणीत आला आहे. अफगाणिस्तानसोबत पाकिस्तानचा तणाव सुरु आहे. तसेच पाकिस्तानमधील बूलचिस्तानमधील बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या नाकात दम भरला आहे.

काही महिन्यांपूर्वी बलोच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानमधील ट्रेन जाफर एक्सप्रेसचे अपहरण केले होते. त्यावेळी 100 पेक्षा जास्त पाकिस्तानी सैनिकांना ओलीस ठेवले होते. काही पाकिस्तानी सैनिकांची हत्याही केली होती.

ट्रेन हायजॅक झाली तेव्हा बलूच आर्मीतील मुलांकडे अत्याधुनिक शस्त्र दिसली. तेव्हापासून त्यांच्याकडे ही शस्त्र येतात कुठून? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. बलूच आर्मीला ईराण आणि अफगाणिस्तानमधून शस्त्र मिळत असल्याचा संशय आहे.

बलूच आर्मी ईराण आणि अफगाणिस्तानमधून काळ्या बाजारातून शस्त्र खरेदी करते. तसेच सन २०२१ मध्ये अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानमधून गेले होते. त्यावेळी सोडून गेलेली शस्त्र बलूच आर्मीकडे असल्याचे म्हटले जाते.

बलूचिस्तान आर्मी अमेरिकेतून शस्त्र मिळते. तसेच काही रिपोर्टमध्ये बलूच आर्मीकडे रशियाचीही शस्त्र असल्याचे म्हटले आहे. बीएलएलकडे एम240बी मशीन गन, एम16ए4 रायफल, आरपीजी-7 लाँचर यासारखे रशियन आणि अमेरिकन घातक शस्त्र आहेत.