
तुमच्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात ज्यांना श्वान अर्थात कुत्रा फार आवडतो. कुत्र्याला पाळण्यासाठी अनेकजण प्रत्येक महिन्याला हजारो रुपये खर्च करतात.

पण हेच पाळीव आणि मोकाट कुत्रे कधीकधी अचानकपणे आक्रमक होतात. कुत्रे मालकावर तसेच इतरांवर अचानकपणे हल्ला का करतात? असा प्रश्न अनेकांना पडतो. कुत्रा आक्रमक होण्याआधी आपल्याला काही संकेत देतो. ते संकेत समजून घेणे फार गरजेचे आहे.

गाझियाबादचे मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी तथा पशुसंवर्धन विभागाचे सहसंचालक डॉ. एस. पी. पांडे यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्यानुसार कुत्रा आपल्या मालकाच्या घरात घुसल्यास तुम्हाला कधी-कधी कुत्रे आक्रमक झाल्याचे दिसते. कुत्र्यांना त्यांचे क्षेत्र सुरक्षित करायचे असते, त्यामुळेच ते अशी कृती करतात, असे पांडेय यांनी सांगितले.

कुत्र्यांची लाळ आणि त्यांच्या कृतीतून ते आक्रमक झाल्याचे काही संकेत मिळतात. कुत्रा फारच तणावात असेल किंवा त्याच्या चालण्याचा वेग वाढला तर तो आक्रमक झाला आहे, असे समजावे.

कुत्र्याने त्याची शेपटी वर केलेली असेल तसेच त्याने कान टवकारलेले असतील तर कुत्रा रागावलेला आहे, असे समजावे. दरम्यान, हे फक्त वरवरचे अंदाज आहेत. त्यामुळे कोणत्याही कुत्र्यापुढे जाताना योग्य ती खबरदारी घ्यावी, असे सांगितले जाते.