IPL 2026 मध्ये विराट कोहली मैदानात कधी उतरणार ? RCB चे संपूर्ण वेळापत्रक पाहा
बीसीसीआयने IPL 2026 संपूर्ण वेळापत्रक जाहीर केल्याने क्रिकेटप्रेमीमध्ये उत्साह संचारला आहे. गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु या हंगामात पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती करण्याच्या जोशात उतरणार आहे. चाहते विराट कोहलीला पुन्हा एकदा मैदानात पाहाण्यास आतुर आहेत. IPL 2026 च्या 16 व्या सिझनमध्ये कोहली मैदानात केव्हा आणि कुठे खेळताना दिसणार आहे हे पाहून घ्या....

IPL 2026 चा 16 हंगाम आता 28 मार्च पासून सुरु होत आहे. 24 मेपर्यंत हा हंगाम चालणार आहे. हंगामाचा पहिलाच सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद मध्ये बंगळुरुत होणार आहे. आरसीबीच्या हंगामाची दमदार सुरुवात होण्याची अपेक्षा आहे. कोहली या सामन्यात आपली छाप उमटवण्यास सज्ज आहे.

आरसीबीचे नेतृत्व रजत पाटीदार करत असून विराट कोहली, टीम डेव्हीड आणि जोश हेझलवूड यांसारख्या अनुभवी खेळाडूंमुळे संघात मजबूत संतुलन निर्माण झाले आहे. संघ पुन्हा सलग दुसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यास सज्ज झाला आहे.

आसीबीसीसाठी एप्रिल व्यस्त महिना आहे. ५ एप्रिल रोजी घरच्या मैदानात चेन्नईविरुद्ध सामना रंगणार आहे. तर १० एप्रिल रोजी गुवाहाटीत त्यांची टक्कर राजस्थानशी होणार आहे. तर १२ एप्रिल रोजी मुंबईत मुंबई इंडियन्स विरुद्ध १५ आणि १८ एप्रिल रोजी बंगळुरूत अनुक्रमे लखनऊ आणि दिल्लीविरुद्ध सामने रंगतील.

आरसीबीची टीम एप्रिल महिन्याच्या अखेरीस गुजरात आणि दिल्लीविरुद्ध महत्त्वाचे सामने खेळणार आहे. २४ एप्रिल रोजी बंगळूरुत गुजरातविरुद्ध आणि २७ एप्रिल रोजी दिल्लीत दिल्लीविरुद्ध सामना रंगणार आहे. ३० एप्रिल रोजी अहमदाबादमध्ये गुजरातविरुद्ध आरसीबी खेळणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे मे महिन्यातील वेळापत्रकही व्यस्त आहे.आरसीबी ७ मे रोजी लखनऊमध्ये मुंबई आणि कोलकाताविरुद्ध, तर १० आणि १३ मे रोजी रायपूरमध्ये सामने रंगणार आहेत. १७ मे रोजी धरमशाला येथे आरसीबीचा सामना पंजाबशी होणार आहे, जो प्लेऑफसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

लीग टप्प्यातील शेवटचा सामना २२ मे रोजी हैदराबादविरुद्ध खेळला जाईल. आरसीबीला अव्वल स्थानी पोहोचण्यासाठी हा सामना निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. संघाची दोन घरची मैदाने असलेली बंगळूरू आणि रायपूर या हंगामात महत्त्वाची भूमिका बजावतील.

आरसीबी हा आयपीएलचा एक मजबूत संघ आहे, विराट कोहली सारख्या महान खेळाडूच्या कामगिरीवर चाहत्यांचे बारीक लक्ष असेल. जर संघाने पुन्हा ट्रॉफी जिंकली, तर तो सलग दोन आयपीएल जिंकणाऱ्या संघांपैकी एक बनेल. (छायाचित्र सौजन्य: पीटीआय/एक्स)