पापलेट, बोंबिल, मांदेली… तोंडाला पाणी सुटलं… मुंबईत कुठे आहेत सर्वात मोठे ‘फिश मार्केट’, मिळतात स्वस्त मासे
मासे म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं... मासे अनेकांना खायला आवडतात. पण अनेकांना माहिती नाही की, मुंबईत चांगले आणि स्वस्त मासे कुठे मिळतात. गेल्या अनेक वर्षांपासून मुंबईत असे फिश मार्केट आहेत, जिथे स्वस्त आणि मस्त मासे मिळतात. तर जाणून घ्या मुंबईत कुठे आहेत मोठे फिश मार्केट...

मुंबईतील सर्वात प्रसिद्ध फिश मार्केट म्हणजे भाऊचा धक्का... भाऊचा धक्का मुंबईतील सर्वात मोठं फिश मार्केट आहे. या बाजारात अनेक मासे प्रेमी मासे खरेदी करण्यासाठी येतात. भाऊचा धक्का या बाजारात ग्राहकांना परवडणाऱ्या दरात मासे खरेदी करता येतात.

ससून डॉक देखील सर्वात मोठा मुंबईतील फिश मार्केट आहे. सर्वात जुन्या बंदरांपैकी एक असलेला ससून डॉक सर्वात जुना आणि सर्वात मोठा फिश मार्केट आहे... ससून डॉकमध्ये अनेक प्रकारचे मासे उपलब्ध असतात. याठिकाणी मासे परवडणाऱ्या दरात मिळतात..

सायन फिश मार्केट अनेकांना माहिती आहे. सायन मार्केट मुंबईतील एक मासळी मार्केट ज्यामध्ये खेकडे देखील खरेदीसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही येथे कमी प्रमाणात मासे देखील खरेदी करू शकता.

दादर फिश मार्केट तर फार मोठं असून हे फिश मार्केट स्टेशनच्या अगदी जवळ आहे. दादर स्टेशनजवळ मोठं मार्केट आहे. याठिकाणी फळं, भाज्या आणि फिश मार्केटमध्ये अनेक प्रकारचे मासे परवडणाऱ्या दरात असतात. येथे मासे घेण्यासाठी अनेक मासेप्रेमी येत असतात.