GK : भारताचे हे जिल्हे म्हणजे सैनिकांचा कारखाना, आकडा ऐकून कराल सलाम

Indian Army : भारतीय सैन्य दलाचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि गौरवशाली आहे. आज भारतीय सेना ही जगातील सर्वात मोठ्या आणि शक्तिशाली सैन्यांपैकी एक मानली जाते. आज आपण सर्वाधिक सैनिक असलेल्या जिल्ह्यांची माहिती जाणून घेणार आहोत.

बापू गायकवाड | Updated on: May 03, 2026 | 10:37 PM
1 / 5
भारतीय सेना आपल्या शौर्यासाठी ओळखली जाते. ती देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाची राखण करते. इंडियन आर्मीमध्ये सर्वाधिक सैनिक उत्तर प्रदेश राज्यातून भरती होतात.

भारतीय सेना आपल्या शौर्यासाठी ओळखली जाते. ती देशाची सुरक्षा, अखंडता आणि सार्वभौमत्वाची राखण करते. इंडियन आर्मीमध्ये सर्वाधिक सैनिक उत्तर प्रदेश राज्यातून भरती होतात.

2 / 5

उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्याला आर्मीचा गड म्हटले जाते. या जिल्ह्यातील गहमर हे गाव सैनिकांचे गाव म्हणून प्रसिद्ध आहे. या गावामुळेच या जिल्ह्याला आर्मीची फॅक्टरी असेही म्हटले जाते.

3 / 5

मीडिया रिपोर्टनुसार, सध्या या भागातून सुमारे 12,000 पेक्षा अधिक जवान सेवेत आहेत, तर 15,000 पेक्षा जास्त माजी सैनिक आहेत. त्यामुळे हे गाव सैनिकांच्या गाव म्हणून ओळखले जाते.

4 / 5

गाझीपूरला अनेकदा ‘वीरांची भूमी’ असे म्हटले जाते, कारण येथे मोठ्या प्रमाणात तरुण भारतीय सैन्यात भरती होऊन देशसेवा करतात.

5 / 5

याशिवाय बिहारमधील भागलपूर जिल्ह्यातील खुटाहा आणि कमरगंज यांसारखी अनेक गावेही सैनिकांच्या संख्येसाठी प्रसिद्ध आहेत. येथेही अनेक कुटुंबांमधील किमान एक सदस्य भारतीय सैन्यात सेवेत असल्याचे दिसून येते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us