आगरी पद्धतीने मऊ-लुसलुशीत भाकरी बनवण्यासाठी कोणता तांदूळ वापरावा?

चपाती खाऊन कंटाळला असाल, तर तुमच्यासाठी तांदळाची भाकरी चांगला पर्याय ठरू शकतो. त्यात आगरी स्टाइल भाकरी फार चविष्ट लागते.

| Updated on: Jul 14, 2026 | 8:25 PM
1 / 6
गरमागरम भाकरीसोबत भाजी खायला सर्वांना आवडते. चपाती खाऊन कंटाळा आला तर आगरी पद्धतीने तांदळाची भाकरी बनवू शकता.

2 / 6
गरम गरम मऊ आणि लुशलुशीत भाकरी असेल तर जेवण रुचकर लागतं. आगरी पद्धतीने भाकरी बनवण्यासाठी तांदळाची निवड देखील महत्त्वाची असते.

3 / 6
आगरी पद्धतीने भाकरी बनवण्यासाठी तांदूळ जुना असल्यास फायदेशीर ठरेल. वाडा कोलम आणि स्थानिक कणसाळ तांदळाचे पीठ वापरल्यास भाकरी चविष्ट होते.

4 / 6
भाकरी बनवण्यासाठी तांदूळ व्यवस्थित धुवून सुकवा. त्यानंतर दळायला द्यावा. पीठ जास्त दिवस ठेवू नका. जास्त दिवसाच्या पिठामुळे भाकरी मऊ होत नाही.

5 / 6
एका भांड्यात पाणी उकळयला ठेवा. त्यानंतर पीठात चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा तेल घालावे. त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ घालावे. काही वेळाने लाटण्यानं व्यवस्थित ढवळून घ्यावे.

6 / 6
उकड काढलेले पीठ कोमट असताना परातीत काढून घ्यावे. त्यानंतर थंड पाण्यात पीठ एकजीव करावे. आता पीठ मऊ होईपर्यंत मळावे. पीठ जास्त मळल्यास भाकरी मऊ होते. भाकरी थापायला सुरुवात कराल, त्यावेळी हाताला कोरडं पीठ लावाया विसरू नका.

Follow Us