
भारताचा विस्फोटक फलंदाज अशी रोहित शर्माची ओळख आहे, रोहित शर्माने आतापर्यंत आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड केले आहेत. कर्णधार म्हणून देखील तो यशस्वी ठरला आहे. त्याच्याच नेतृत्वात आपण वनडे वर्ल्ड कपच्या फायनलला धडक मारली होती.

त्यानंतर टी 20 वर्ल्ड कप आणि नुकतीच झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी देखील आपण रोहित शर्माच्या नेतृत्वाखालीच जिंकली आहे. रोहित शर्मा फलंदाजीच्या आक्रमक शैलीसाठी ओळखला जातो.

रोहित शर्मा जेवढा उत्तम क्रिकेटर आहे, तेवढाच तो एक जबाबदार पती आणि वडील देखील आहे. रोहित शर्माला दोन मुलं आहेत, त्याची मोठी मुलगी समायरा आता शाळेत जात आहे.

जशी प्रत्येक आई -वडिलांना आपल्या पाल्याच्या भविष्याची चिंता असते तेवढीच चिंता रोहित आणि त्याची पत्नी रितिका यांना देखील आपल्या मुलांच्या भवितव्याची आहे. त्यामुळे रोहितने आपल्या मुलीला मुंबईतील सर्वात प्रसिद्ध आणि महागड्या शाळांपैकी एक असलेल्या धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये (DAIS) प्रवेश दिला आहे.

रिलायन्स ग्रुपचे मालक मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी यांनी या शाळेची स्थापना 2003 मध्ये केली होती, या शाळेत प्रवेश घेणाऱ्या मुलांना जागतीक दर्जाच्या सुविधा मिळाव्यात या उद्देशानं ही शाळा सुरू करण्यात आली.

या शाळेत रोहित शर्माच्या मुलीसोबतच अनेक सेलिब्रेटींच्या मुलांनी देखील प्रवेश घेतला आहे. या शाळेची फी जरी प्रचंड असली तरी देखील अनेक जण या शाळेलाच शिक्षणासाठी प्राधान्य देताना दिसून येतात.

रोहित शर्माची मुलगी समायरा याच शाळेत शिकते, त्यासाठी रोहित शर्माला फी म्हणून वर्षाकाळी जवळपास 14 ते 20 लाख रुपये एवढा खर्च येतो.