Freida Pinto : 8 ऑस्कर पुरस्कार जिंकणाऱ्या ‘स्लमडॉग मिलियनेयर’ फिल्मची अभिनेत्री फ्रीडा पिंटो हिरॉइन बनण्याआधी काय करायची ?

बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी हिंदी इंडस्ट्रीमध्ये काम केलेलं नाही. पण परदेशात राहून भारताचं नाव उज्वल केलय. अभिनेत्री फ्रीडा पिंटोचा सुद्धा त्याच श्रेणीमध्ये समावेश होतो.

| Updated on: Oct 18, 2025 | 5:01 PM
1 / 5
अभिनेत्री फ्रीडा पिंटोचा आज वाढदिवस आहे. हॉलिवूडमध्ये कमाल दाखवणारी ही अभिनेत्री आज 41 वर्षांची झाली आहे. तिच्या जन्मदिनी 'स्लमडॉग मिलियनेयर' चित्रपटाआधीच्या तिच्या करिअरवर नजर टाकूया.

2 / 5
फ्रीडा पिंटो चित्रपटात येण्याआधी एक मॉडेल आणि अँकर होती. तिने मॉडलिंगमधून आपल्या करिअरची सुरुवात  एलीट मॉडल मॅनेजमेंट इंडियामधून केली. अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या जाहीरातींमध्ये ती दिसलेली.

3 / 5
फ्रीडाने एक इंटरनॅशनल टूरिज्म शो,'फुल सर्कल' होस्ट केलेला. तिने 2005 मध्ये मॉडलिंग सुरु केलं. ती रिग्लीज च्युइंग गम, स्कोडा आणि वोडाफोन इंडिया सारख्या ब्रांडसाठी टेलीविजन आणि प्रिंट जाहीरातींमध्ये दिसली.

4 / 5
वर्ष 2006 आणि 2008 दरम्यान तिने इंटरनॅशनल आशिया पॅसिफिक टूरिज्म शो 'फुल सर्कल' यजमानपद भूषवलं. तिला अफगाणिस्तान, फिजी, मलेशिया, सिंगापूर आणि थायलंड सारख्या देशांचे दौरा करण्याची संधी मिळाली.

5 / 5
मॉडलिंग आणि अँकरिंग सोबत फ्रीडाने फिल्मस आणि टेलीविजन शो साठी ऑडिशन द्यायला सुरुवात केलेली. तिला अनेकदा रिजेक्शनचा सामना करावा लागला.  'स्लमडॉग मिलियनेयर' चित्रपटाने फ्रीडा पिंटो आणि देव पटेलला घराघरात पोहोचवलं.  हा चित्रपट ऑस्कर पर्यंत गेला.  या चित्रपटानंतर फ्रीडा आणि देव दोघांनी  हॉलीवुडकडे मोर्चा वळवला.