Ketan Agarwal Case: ज्याच्यासाठी सियाने करोडपती केतनला मारले तो कोण आहे चेतन चौधरी? त्याचे कुटुंबिय काय करते?

Who is Chetan Choudhari : सध्या देशभरात केतन अग्रवाल हत्याकांड चर्चेत आहे. केतनची हत्या त्याची होणारी पत्नी सिया गोयलने केली. तिने या हत्येचा कट बॉयफ्रेंड चेतन चौधरीसोबत मिळून केला. आता हा चेतन चौधरी आहे तरी कोण? जाणून घ्या...

| Updated on: Jun 25, 2026 | 12:49 PM
1 / 6
सिया आणि चेतन यांची ओळख एका पार्टीमध्ये झाली होती. दिवाळीच्या निमित्ताने एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. तिथे सिया आणि चेतनची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांचे प्रेमप्रकरण खऱ्या अर्थाने सुरु झाले.

सिया आणि चेतन यांची ओळख एका पार्टीमध्ये झाली होती. दिवाळीच्या निमित्ताने एक पार्टी आयोजित करण्यात आली होती. तिथे सिया आणि चेतनची पहिली भेट झाली. त्यानंतर त्यांचे प्रेमप्रकरण खऱ्या अर्थाने सुरु झाले.

2 / 6

दरम्यान, सिया आणि केतन अग्रवाल यांचे लग्न कुटुंबियांनी ठरवले होते. घरच्यांच्या विरोधात सियाला जाता येत नव्हते. त्यामुळे तिने सारखपुडा करण्यास होकार दिला. पण सिया आणि तिचा बॉयफ्रेंड चेतनने केतनला रस्त्यातून बाहेर काढण्याचे ठरवले होते. या सगळ्यात सियाला सतत मदत करणारा चेतन आहे तरी कोण? जाणून घ्या...

3 / 6

चेतनचे नाव चेतन बाबुलाल चौधरी असे आहे. तो 23 वर्षांचा आहे. त्याने बीबीएचे (बॅचलर ऑफ बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन) शिक्षण घेतले आहे. चेतन उत्तम क्रिकेटर होता. मोठ्या टुर्नामेंट खेळण्याचे त्याचे स्वप्न होते.

4 / 6

चेतन हा प्रसिद्ध व्यावलायिक बाबुलाल चौधरी यांचा मुलगा. त्यांचे कुटुंबिय देखील व्यावसायिक आहेत. त्याच्या कुटुंबियांचा ड्रायफ्रूटचा बिझनेस आहे. पुण्यातील मार्केट यार्ड भागात त्यांचे दुकान आहे.

5 / 6

चेतन आणि सिया या दोन्ही कुटुंबियांची दुकाने आजूबाजूला होती. त्यामुळे दोघांचे कुटुंबिय एकमेकांना ओळखत होते. पण त्यांच्या प्रेमप्रकरणाबद्दल घरी कोणाला माहिती नव्हते.

6 / 6

केतन अग्रवालला सिया आणि चेतन यांच्यामध्ये केवळ मैत्री असल्याचे माहिती होते. त्यामुळे त्याने कधीही दोघांच्या मैत्रीवर आक्षेप घेतला नाही.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us