
माजी मंत्री धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे यांची मुलगी वैष्णवी मुंडे ही सध्या चर्चेत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवारी बीड जिल्हा दौऱ्यावर असताना धनंजय मुंडे हे दिवसभराच्या कार्यक्रमांमध्ये अनुपस्थित होते. प्रकृती अस्वस्थेमुळे अनुपस्थित असल्याची माहिती भाषण करताना अजितदादांनी दिली. मात्र, सायंकाळी धनंजय मुंडे यांनी लेकीच्या फॅशन शोला हजेरी लावली. तेव्हा पासून त्यांची लेक चर्चेत आहे.

धनंजय मुंडे यांची लेक वैष्णवीने गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडलेला फॅशन शो आयोजित केला होता. तिने तेथील फोटो शेअर केले होते. त्यानंतर वैष्णवी नेमकं काय करते? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

वैष्णवी ही धनंजय मुंडेंची मोठी मुलगी आहे. त्यांच्या धाकट्या मुलीचे नाव अधीश्री आहे.

वैष्णवीने फॅशन डिझायनिंगचे शिक्षण घेतले आहे.

सध्या वैष्णवी मुंबईतील एका नामांकित कंपनीमध्ये मार्केटिंग डायरेक्टर म्हणून काम करत आहे.