Abhijeet Dipke : अभिजीत दीपकेसोबत दिसली, फोटोही व्हायरल, आंदोलनातली ती तरुणी कोण? सर्वांच्याच खिळल्या नजरा!
अभिजीत यांनी जेव्हा जल्लोष केला, तेव्हा तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अभिजीत दीपके, सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका, सीजेपीच्या खात्याला टॅग करण्यात आला होता. हाच व्हिडीओ वैष्णवी गौर हिलादेखील टॅग केला होता.

कॉकरोच जनता पार्टीच्या दिल्लीतील आंदोलनाला अखेर यश मिळालं. धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सोबतच केंद्र सरकारने सीजेपीच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.

दरम्यान, आता या आंदोलनात सहभागी असलेल्या तसेच या आंदोलनाचे नेतृत्त्व करणाऱ्या चेहऱ्यांची चर्चा होत आहे. हे चेहरे नेमके कोण आहेत, ते काय करतात, असं विचारलं जातंय.

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर अभिजीत दीपके यांनी जल्लोष केला. यावेळी त्यांच्यासोबत एक तरुणी दिसून आली. ही तरुणी नेमकी कोण, असं विचारलं जातंय. मिळालेल्या माहितीनुसार या तरुणीचे नाव वैष्णवी गौर असे आहे.

अभिजीत यांनी जेव्हा जल्लोष केला, तेव्हा तो व्हिडीओ इन्स्टाग्रामवर अभिजीत दीपके, सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका, सीजेपीच्या खात्याला टॅग करण्यात आला होता. हाच व्हिडीओ वैष्णवी गौर हिलादेखील टॅग केला होता. संपूर्ण आंदोलनात वैष्णवी ही अभिजीतसोबत होती.

सध्यातरी ती नेमकी कोण आहे, काय करते याबाबत पुरेशी माहिती मिळालेली नाही. परंतु संपूर्ण आंदोलनात वैष्णवीने सीजेपीची साथ दिली. वेगवेगळ्या पातळीवर आंदोलनात तिने अभिजीतला साथ दिली आहे. तीही सीजेपीच्या या आंदोलनाची भाग होती.