वेस्ट इंडिजच्या विरोधात वनडेत सर्वाधिक शतकं ठोकणारे भारतीय फलंदाज कोणते ?
भारत आणि वेस्टइंडीज दरम्यान तीन दिवसांची वनडे सिरिज होणार आहे. यात भारतीय टीमचा कप्तान शुभमन गिल आहे. परंतू सर्वांच्या नजरा विशेषरुपाने विराट कोहली आणि रोहित शर्मावर लागली आहेत. वेस्टइंडिज विरोधात एक दिवसीय सामन्यात सर्वाधिक शतके ठोकणाऱ्या भारतीय फलंदाजांची नावे तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. चला तर हे पाच फलंदाज कोण ते पाहूयात....

virat kohli
- वेस्टइंडीजच्या विरोधात सर्वाधिक वनडे शतक ठोकणाऱ्या फलंदाजात विराट कोहली याचे नाव आहे. कोहलीने आतापर्यंत वेस्टइंडिज विरोधात ४३ मॅच खेळून ९ शतके ठोकली आहेत. इतर भारतीय फलंदाजापेक्षा विराट कोहली यात पुढे आहे.
- सचिन तेंडुलकर या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत सचिनने वेस्ट इंडिज विरोधात ३९ मॅच खेळून ४ शतके ठोकली आहेत. त्याने ११ अर्धशतके देखील ठोकली आहेत.
- युवराज सिंह याचा नंबर या बाबतीत तिसरा आहे. युवराजने वेस्टइंडिजच्या विरोधात त्याच्या कारकीर्दीत ३१ मॅच खेळून तीन शतके ठोकलेली आहेत. त्याच्या नावावर ५ अर्धशतके देखील आहेत.
- रोहित शर्मा हा यात चौथ्या क्रमांकावर येतो. रोहितने वेस्टइंडिजच्या विरोधात ३७ मॅच खेळून आतापर्यंत तीन शतके ठोकली आहेत. रोहित शर्मा याने या सिरीजमध्ये अजून एक शतक ठोकले तर तो युवराजच्या पुढे जाईल.
- राहुल द्रविड देखील या यादीत आहे. आपल्या वनडे करियरमध्ये द्रविड याने वेस्ट इंडिजच्या विरोधात ४० मॅच खेळून ३ शतके ठोकली आहेत. त्याच्यानावावर आठ अर्धशतके देखील केली आहेत.
Follow Us





