‘रामायण’मध्ये रावण साकारणाऱ्या यशची पत्नी कोण? एकेकाळी होती आघाडीची अभिनेत्री, या कारणासाठी सोडली इंडस्ट्री

राधिकाची 2007 मध्ये यशसोबत पहिली भेट झाली होती. या दोघांनी एकत्र चित्रपटांमध्ये कामसुद्धा केलं होतं. लग्नापर्यंत या दोघांनी त्यांचं नातं माध्यमांपासून लपवून ठेवलं होतं. लग्नानंतर राधिकाने अभिनयक्षेत्रातून ब्रेक घेतला.

| Updated on: Aug 11, 2026 | 3:13 PM
1 / 5
'केजीएफ' स्टार यशच्या दोन चित्रपटांबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. एकीकडे नितेश तिवारी दिग्दर्शित 'रामायण' या चित्रपटात तू रावणाची भूमिका साकारणार आहे. तर दुसरीकडे 'टॉक्सिक' या बहुचर्चित चित्रपटात तो मुख्य भूमिका साकारत आहे. कन्नड चित्रपटसृष्टीतून बॉलिवूडपर्यंत आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या यशच्या या प्रवासात त्याच्या पत्नीचा मोठा वाटा आहे.

2 / 5
यशची पत्नी राधिका पंडित हीसुद्धा अभिनेत्रीच आहे. तिने कन्नड चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. एकेकाळी राधिका ही कन्नड चित्रपटसृष्टीतील आघाडीची आणि सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून तिने करिअरची सुरुवात केली होती.

3 / 5
2008 मध्ये 'मोग्गिना मनसू' या चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. यासाठी तिला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर लव्ह गुरू, मिस्टर अँड मिसेस रामचारी आणि कृष्णन लव्ह स्टोरी या चित्रपटांमध्येही तिने उल्लेखनीय काम केलं.

4 / 5
राधिकाला शिक्षिका बनायचं होतं. परंतु एका मैत्रिणीच्या आग्रहाखातर ती एका शोसाठी ऑडिशन द्यायला गेली होती. आश्चर्याची बाब म्हणजे कोणत्याही ऑडिशनशिवाय राधिका तिथे निवडली गेली होती. तिने 2016 मध्ये यशसोबत लग्न केलं. लग्नानंतर तिने वैवाहिक आयुष्यावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला.

5 / 5
2019 मध्ये प्रदर्शित झालेला 'आदि लक्ष्मी पुराण' हा तिचा शेवटचा चित्रपट होता. त्यानंतर तिने अभिनयक्षेत्रात काम केलं नाही. लग्नानंतर राधिका शेतकरी आणि मजुरांसाठी बनवलेल्या तिच्या फाऊंडेशनचं काम पाहू लागली. पडद्यामागे राहून तिने यशची खूप साथ दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us