ज्याने मोठं केलं, त्यालाच दणका, मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांनाच हारवणारा तो पठ्ठ्या कोण? विजयने लावली होती फिल्डिंग!
या पक्षाने सत्ताधारी डीएमके पक्षाला पराभूत केले आहे. या पक्षाने आतापर्यंत 110 जागांवर विजय मिळवल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे डीएमके या पक्षाला फक्त 71 जागा मिळत असल्याचे दिसत आहे.

तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा धक्कादायक असा निकाल लागला आहे. या निवडणुकीत नव्याने स्थापन झालेल्या तमिळ वेत्री कळघम अर्थात टीव्हीके या पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे.

या पक्षाने सत्ताधारी डीएमके पक्षाला पराभूत केले आहे. या पक्षाने आतापर्यंत 110 जागांवर विजय मिळवल्याचे समोर आले आहे. तर दुसरीकडे डीएमके या पक्षाला फक्त 71 जागा मिळत असल्याचे दिसत आहे.

विशेष म्हणजे या निवडणुकीत डीएमके पक्षाचे सर्वेसर्वा तथा तमिळनाडूचे विद्यमान मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांचादेखील पराभव झाला आहे. टीव्हीके पक्षाचे व्ही एस बाबू यांनी त्यांना तब्बल 8795 मतांनी पराभूत केले आहे. व्ही एस बाबू यांना 82997 मतं मिळाली तर स्टॅलिन यांना 74202 मतं मिळाली.

विशेष म्हणजे व्ही एस बाबू हे याआधी डीएमके पक्षात होते. सोबतच ते काही काळी एआयडीएमके या पक्षातही होते. 75 वर्षीय बाबू यांनी 2006 ते 2011 या काळात पुरासावाल्कम या मतदारसंघातून आमदारकी भूषणवली आहे. ते डीएमके पक्षाचे 2011 सालापर्यंत उत्तर चेन्नईचे जिल्हा सचिवही होते.

डीएमके पक्षात काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी एआयएडीएमके पक्षात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी याच वर्षी टीव्हीके या पक्षात प्रवेश केला होता. ते सध्या या पक्षाचे महासचिव आहेत. आता त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच पराभूत केल्यामुळे त्यांची देशभरात चर्चा होत आहे.