
मुंबईच्या पहिल्या डॉनचं नाव हाजी मस्तान असं होतं. 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई' सिनेमातील सल्तान मिर्झा हे पात्र मस्तान याच्यावर आधारलेलं आहे.

हाजी मस्तान हा एक तामिळ येथील तस्कर होता. जो 1960 आणि 1970 च्या दशकात गुन्हेगारी विश्वात सक्रिय होता. मस्तान याला मुंबईतील अंडरवर्ल्डचा नायक मानलं जात होतं.

मस्तान तस्करी, बळजबरी वसूली आणि सट्टेबाजी यांसारख्या अवैध कामांमध्ये सक्रिय होता. अनेक अपराध त्याने केले. मस्तानचा उदय अशा वेळी झाला जेव्हा मुंबई अंडरवर्ल्ड एक संघटित गुन्हेगारी सिंडिकेट म्हणून मजबूत होऊ लागली होती.

मस्तान त्याच्या दादागिरीमुळे प्रसिद्ध होता. मस्तान सिनेमांची निर्मिती देखील करायचा. एक काळ असा होता, जेव्हा मस्तान बॉलिवूड सेलिब्रिटींना स्वतःच्या दबावामध्ये ठेवायचा...

बॉलिवूडमध्ये दहशत निर्माण केल्यानंतर मस्तान ची मुंबईवर पकड आणखी मजबूत झाली. मस्तानच्या राज्यामुळेच दाऊद इब्राहीम आणि छोटा राजन यांसारख्या गुंडांचा जन्म झाला. मस्तानला 'गॉडफादर' म्हटलं जायचं...