AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘क्रांतिज्योति विद्यालय’च्या यशानंतर हेमंत ढोमेची मोठी घोषणा; तुम्हीही व्हाल खुश!

प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळणाऱ्या या चित्रपटात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, हरीश दुधाडे, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चलचित्र मंडळी निर्मित या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हेमंत ढोमे यांचे असून, क्षिती जोगने निर्मितीची धुरा सांभाळली आहे.

'क्रांतिज्योति विद्यालय'च्या यशानंतर हेमंत ढोमेची मोठी घोषणा; तुम्हीही व्हाल खुश!
krantijyoti vidyalay marathi madhyam Image Credit source: Instagram
| Updated on: Feb 06, 2026 | 10:36 AM
Share

हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘क्रांतिज्योती विद्यालय- मराठी माध्यम’ या मराठी चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालच केली आहे. अवघ्या सहा कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने आतापर्यंत कमाईचा 25 कोटी रुपयांचा महत्त्वाचा टप्पा पार करत आपलं यश अधिक भक्कम केलं आहे. मराठी माध्यमाच्या शाळेच्या अस्मितेला ठाम आवाज देणारा हा चित्रपट अनेकांच्या पसंतीस उतरला आहे. या भरीव यशानिमित्त चित्रपटाच्या टीमकडून भव्य सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्याला चित्रपटातील कलाकार आणि तांत्रिक टीमसह मराठी सिनेसृष्टीतील अनेक नामवंत कलाकार आणि मान्यवरांची उपस्थिती होती.

समारंभादरम्यान या चित्रपटाच्या प्रचंड यशावर आनंद व्यक्त करत निर्माते-दिग्दर्शकांनी टीमचे आणि प्रेक्षकांचे आभार मानले. विशेष म्हणजे, याच सोहळ्यात प्रेक्षकांसाठी मोठ्या सरप्राइजची घोषणाही करण्यात आली. प्रेक्षकांच्या मनात घर केलेल्या कथेला पुढे नेत असलेला ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम 2’ या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली.

‘क्रांतिज्योती विद्यालय -मराठी माध्यम’ला मिळालेल्या प्रचंड प्रेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाला, “हा चित्रपट प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारला, ही आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. 25 कोटी रुपयांचा टप्पा गाठणं ही संपूर्ण टीमची मेहनत आणि प्रेक्षकांच्या प्रेमाची पावती आहे. कलाकार, तंत्रज्ञ, निर्माते आणि पडद्यामागे काम करणाऱ्या प्रत्येक सदस्याचे मनापासून आभार मानतो. तसंच रसिक प्रेक्षकांचे ऋण शब्दांत मांडता येणार नाही. याच प्रेमामुळे आम्हाला अधिक प्रामाणिक, आशयघन चित्रपट घेऊन येण्याची ऊर्जा मिळते.”

या यशस्वी प्रवासात सचिन खेडेकर, अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर, क्षिती जोग, कादंबरी कदम, निर्मिती सावंत, पुष्कराज चिरपुटकर आणि प्राजक्ता कोळी यांसारख्या कलाकारांच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. शिक्षक-विद्यार्थी नात्याची भावनिक मांडणी, वास्तवाशी जोडलेला आशय आणि मराठी शाळेच्या आठवणी जागवणारे प्रसंग यामुळे हा चित्रपट केवळ यशस्वी ठरला नाही, तर प्रेक्षकांसाठी एक भावनिक अनुभव ठरला. 25 कोटींचा टप्पा, सत्कार समारंभाचा जल्लोष आणि सीक्वेलच्या घोषणेमुळे ‘क्रांतिज्योती विद्यालय – मराठी माध्यम’चा प्रवास आता नव्या उंचीवर पोहोचताना दिसत आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाच्या बळावर ही टीम पुन्हा एकदा दमदार आणि आशयपूर्ण कथा घेऊन येण्यासाठी सज्ज झाली आहे.

Follow Us
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा
तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; MPSC विद्यार्थ्यांचं
MPSC Protest Pune : तिरडीवर चिरडलेली स्वप्नं, हातात घोषणाबाजीचे फलक; तिरडी यात्रेतून MPSC विद्यार्थ्यांचं पुण्यात सरकारविरोधात जोरदार आंदोलन
इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
Viral Video : इम्तियाज जलील यांच्यावर नोटांची उधळण; शिरूरच्या कार्यक्रमातील VIDEO सोशल मीडियावर व्हायरल, नेमकं काय घडलं?
महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार
Mahayuti : महायुतीतच फ्रेंडली फाईटची शक्यता; पुणे शिक्षक मतदारसंघात चिवटे विरुद्ध गावडे, माघार कोण घेणार?
महाराष्ट्रात १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात
Drought : महाराष्ट्रात दुष्काळाचं संकट गडद; १६ ऑक्टोबरपासून तब्बल एवढे टक्के पाणीकपात; सरकारचा मोठा निर्णय काय?