Sanchita Ugale Death Reason : विक्की कौशलसोबत चमकली, 30 व्या वर्षीच आयुष्य संपवलं, कोण होती संचिता उगले?

अभिनेत्री संचिता उगले हिने वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी आयुष्य संपवल्याने बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे. 'कुमकुम भाग्य', 'वागले की दुनिया' आणि विक्की कौशलसोबत 'छावा' सिनेमात चमकलेल्या या मराठमोळ्या अभिनेत्रीने कमी वेळात मोठा पल्ला गाठला होता.

| Updated on: Jun 15, 2026 | 2:11 PM
1 / 4
एका प्रतिभा संपन्न अभिनेत्रीने आयुष्य संपवल्याने बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे. वयाच्या अवघ्या 30 वर्षीच संचिताने आयुष्य संपवलं. त्यामुळे सर्वच हादरून गेलेआहेत. कुमकुम भाग्य, वागले की दुनिया, दिलवाली दुल्हा ले जाएगी आणि विक्की कौशलच्या छावा सारख्या सिनेमात ती चमकली होती. तिच्या कामाचंही कौतुक झालं होतं. अजून तिला करिअरचा मोठा टप्पा गाठायचा होता. पण त्यापूर्वीच तिने जगाला अलविदा केलं. त्यामुळे बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. तर संचिताच्या मृत्यूचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. (all Photos : Instagram)

2 / 4
कोण होती संचिता? - संचिता उगले ही अस्सल मराठमोळी होती. पण हिंदीत तिने आपला चांगला जम बसवला होता. संचिता अहिल्यानगरच्या संगमनेरची राहणारी होती. मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या संचिताने अल्पावधीतच टीव्ही इंडस्ट्रीत जम बसवला होता. लहानपणी टीव्ही सीरिअल पाहायची. त्यामुळे आपणही अभिनेत्री व्हावं असं तिला वाटायचं. त्यामुळे तिने नगरला नाटकात काम करायला सुरुवात केली होती. छोट्या छोट्या भूमिका ती साकारायची. त्यानंतर तिचं काम पाहून तिला मोठ्या भूमिकाही मिळू लागल्या.

3 / 4
 2023 नंतर संचिताच्या करिअरने वेग घेतला. तिला कुमकुम भाग्यमध्ये दीया टंडनची व्यक्तीरेखा साकारायला मिळाली. त्यामुळे तिच्या आयुष्याला टर्निंग पॉइंट मिळाला. त्यानंतर संचिताने मागे वळून पाहिलं नाही. या मालिकेने केवळ मला ओळखच निर्माण करून दिली नाही तर माझ्या आईवडिलांनाही अभिमान वाटण्याची संधी दिली, असं संचिता नेहमी म्हणायची. जवळपास दीड वर्ष ती या मालिकेत काम करत होती. या काळात तिने एक अभिनेत्री म्हणून स्वत:ला सिद्ध केलं.

4 / 4
कोणत्या मालिकेत कोणती भूमिका? -  वागले की दुनियेत तिने रुचिता जेटली ही व्यक्तीरेखा साकारली. त्यानंतर दिलवाली दूल्हा ले जाएगीमध्ये सुकून नावाची मुख्य व्यक्तिरेखा साकारली. या मालिकेत ती सोराब बेदी सोबत काम करत होती. या भूमिकेतून तिच्या अभिनेयाची रेंज दिसून आली. 'छावा' सिनेमात तिने तारा राणी यांचा रोल साकारला.  विक्की कौशल हा या चित्रपटात मुख्य भूमिकेत होता. तर सायलेन्स-२ द नाईट आऊल बार शूट आऊटमध्ये तिने मनोज वाजपेयी सोबत काम केलं. त्याशिवाय क्राइम आजकलमध्येही ती दिसली होती.

Follow Us