
नवरा कधी येणार? यावर गीता म्हणाली, ज्यावेळी यायचं असेल, तेव्हा येईल. लग्नाबद्दल मी विचार करत नाही, असं तिने सांगितलं. लिवइनमध्ये राहण्याचा प्लान ती करु शकते.

तडजोडी कराव्या लागतील म्हणून लग्न करत नाहीय का? त्यावर गीता कपूर म्हणाली की, तडजोडीचा प्रश्न नाहीय. पण मला माझा स्पेस हवा आहे. मला माझा स्पेस हवा आहे. आज ज्या पद्धतीच जग आहे, जी सेंसिटिविटी आहे. ती गोष्ट कदाचित मला समजणार नाही असं गीता कपूर म्हणाली.

लोकांच्या मनात माझ्याबद्दल बरेच गैरसमज आहेत. असं नाहीय की माझ्या आयुष्यात कधी कोण पुरुष नव्हता. लोक माझ्याबद्दल असा विचार का करतात? असं गीत म्हणाली. ज्यांना अप्रोच करायचा असतो, ते करतात. पण आता कोणाला काही लॉन्ग टर्ममध्ये नकोय असं गीता कपूर म्हणाली.

लग्न एक संस्था म्हणून मरतेय. लग्नावर माझा जास्त विश्वास आहे. ज्या दिवशी मी लग्न करेन, त्या दिवशी त्याने मला सोडून दाखवावं असं गीता कपूर म्हणाली.

सलमान खान माझा क्रश आहे. मला वाटतं, सलमानला ही गोष्ट माहितीय. तो एकदा माझ्याशी बोललेला त्यानंतर मला रडू कोसळलेलं असं गीता कपूरने सांगितलं.