Flight Drinking Facts : विमानात दारू प्यायल्यावर नशा जास्त का चढते ? 99 टक्के लोक कारण ऐकून गरगरतील

फ्लाइटमध्ये दारू प्यायल्यानंतर जमिनीच्या तुलनेत तिचा परिणाम अधिक जाणवतो असं का वाटतं ? यामागचं कारण सोप्या भाषेत घ्या जाणून

| Updated on: Sep 23, 2026 | 6:53 PM
1 / 11
जमिनीवर असताना एखादं ड्रिंक घेतल्यानंतर जितकी नशा होते, त्यापेक्षा फ्लाइटमध्ये दारू प्यायल्यानंतर तिचा परिणाम अधिक वेगाने जाणवतो, असं तुम्हाला कधी जाणवलं आहे का ? असं होत असल्यास, त्यामागे फक्त गैरसमज किंवा अफवा नाही. फ्लाइटदरम्यान शरीर ज्या परिस्थितीतून जाते, त्यामुळे दारूचा परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवू शकतो. (All Image Credit Source: Social Media)

जमिनीवर असताना एखादं ड्रिंक घेतल्यानंतर जितकी नशा होते, त्यापेक्षा फ्लाइटमध्ये दारू प्यायल्यानंतर तिचा परिणाम अधिक वेगाने जाणवतो, असं तुम्हाला कधी जाणवलं आहे का ? असं होत असल्यास, त्यामागे फक्त गैरसमज किंवा अफवा नाही. फ्लाइटदरम्यान शरीर ज्या परिस्थितीतून जाते, त्यामुळे दारूचा परिणाम अधिक स्पष्टपणे जाणवू शकतो. (All Image Credit Source: Social Media)

2 / 11

विशेषतः लांब पल्ल्याच्या फ्लाइटमध्ये प्रवास करताना केबिनमधील हवेचा दाब, कमी आर्द्रता, थकवा आणि झोप यांसारख्या गोष्टींचा शरीरावर परिणाम होतो. त्यात दारूची भर पडल्यास चक्कर येणं, सुस्ती किंवा थकवा यांसारखे परिणाम अधिक जाणवू शकतात. विमान जमिनीपासून हजारो फूट उंचीवर उडते. मात्र, केबिनमधील वातावरण बाहेरील वातावरणाप्रमाणे पूर्णपणे नसतं आणि प्रवाशांसाठी योग्य पातळीवर दाब नियंत्रित केला जातो. तरीही जमिनीवरील वातावरणाच्या तुलनेत केबिनची परिस्थिती वेगळी असते.

3 / 11

या परिस्थितीत शरीरातील ऑक्सिजन सॅच्युरेशन थोडं कमी होऊ शकतं. सामान्यतः निरोगी व्यक्तीमध्ये ही घट मर्यादित असते; मात्र दारू प्यायल्यानंतर येणारी झोप आणि सुस्ती यांच्यासोबत त्याचा अनुभव अधिक जाणवू शकतो. सोप्या भाषेत सांगायचं तर, दारू ही स्वतःच मेंदू आणि मज्जासंस्थेची कार्यक्षमता मंदावते. त्यासोबत फ्लाइटचा थकवा आणि केबिनमधील परिस्थिती ॲड झाली, तर व्यक्तीला दारूचा परिणाम अधिक जाणवू शकतो.

4 / 11

फ्लाइटदरम्यान शरीरात पाण्याची कमतरता होण्याची शक्यता वाढू शकते. विमानाच्या केबिनमध्ये आर्द्रतेचे प्रमाण सामान्य घरातील वातावरणापेक्षा कमी असतं. दीर्घ प्रवासादरम्यान पुरेसे पाणी न प्यायल्यास शरीर डिहायड्रेट होऊ शकतं.

5 / 11

दारूमुळेही शरीरातून द्रव बाहेर जाण्याची प्रक्रिया वाढू शकते. त्यामुळे दारूसोबत पुरेसं पाणी न प्यायल्यास डोकेदुखी, तोंड कोरडं पडणं, थकवा आणि अस्वस्थता यांसारख्या समस्या अधिक जाणवू शकतात. त्यामुळे फ्लाइटदरम्यान दारू पिणाऱ्या व्यक्तींसाठी पुरेसे पाणी पिणं हे खूप महत्त्वाचं असतं.

6 / 11

लांब पल्ल्याच्या फ्लाइटमध्ये अनेक तास सतत बसून राहणं, झोपेचं शेड्युल बदलणंणे आणि वेळेतील फरकामुळे शरीरावर थकवा येऊ शकतो. विशेषतः आंतरराष्ट्रीय फ्लाइटमध्ये जेट लॅगची समस्याही होऊ शकते. अशा परिस्थितीत जर एखाद्या व्यक्तीने दारू प्यायली, तर तिला झोप आणि सुस्ती अधिक जाणवू शकते. त्यामुळे अनेकदा असे वाटते की फ्लाइटमध्ये दारू जमिनीपेक्षा अधिक वेगाने नशा चढवते.

7 / 11

पण एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं आवश्यक आहे. फ्लाइटमध्ये दारू प्यायल्याने रक्तातील अल्कोहोलचे प्रमाण आपोआप वाढत नाही. त्यामुळे विमानात प्यायलेला एक पेग जमिनीवर प्यायलेल्या दोन पेगइतका होतो, असे म्हणणं योग्य नाही. प्रत्यक्षात केबिनमधील वातावरण, झोपेचा अभाव, थकवा, डिहायड्रेशन आणि दारूचा परिणाम हे सर्व एकत्र आल्यामुळे व्यक्तीला नशा अधिक जाणवू शकते.

8 / 11

विमानाच्या केबिनसारख्या परिस्थितीचा आणि दारूच्या परिणामांचा अभ्यास करणाऱ्या संशोधनातही या मुद्द्याकडे लक्ष देण्यात आलं. एका अभ्यासात असं आढळलं की कमी केबिन प्रेशरची परिस्थिती आणि अल्कोहोल यांचा एकत्रित परिणाम झाल्यास झोपेदरम्यान ऑक्सिजन सॅच्युरेशनमध्ये घट आणि हृदयाच्या ठोक्यांच्या दरात वाढ होऊ शकते. याचा अर्थ असा नाही की प्रत्येक व्यक्तीला फ्लाइटमध्ये दारू प्यायल्याने गंभीर समस्या निर्माण होतील. व्यक्तीचे वय, आरोग्य, दारूचे प्रमाण आणि इतर घटकांनुसार परिणाम वेगवेगळे असू शकतात.

9 / 11

लांब पल्ल्याच्या फ्लाइटमध्ये दारू घेत असाल, तर तिचे प्रमाण मर्यादित ठेवणे आणि त्यासोबत पुरेसे पाणी पिणे महत्त्वाचे आहे. सतत दारू पिण्यापेक्षा शरीराला हायड्रेट ठेवणे अधिक आवश्यक आहे. ज्या व्यक्तींना आधीपासून हृदय किंवा श्वसनाशी संबंधित समस्या आहेत, त्यांनी फ्लाइटदरम्यान दारू घेताना विशेष काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत आपल्या वैयक्तिक आरोग्याचा विचार करून डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

10 / 11

थोडक्यात सांगायचं झालं तर, विमानात दारू प्यायल्याने रक्तातील अल्कोहोलचं प्रमाण अचानक वाढतं असं नाही. मात्र फ्लाइटदरम्यान केबिनमधील वातावरण, कमी आर्द्रता, थकवा, झोपेची कमतरता आणि शरीरातील ऑक्सिजनच्या पातळीत होणारा सामान्य बदल यामुळे दारूचा परिणाम अधिक जाणवू शकतो.

11 / 11

म्हणूनच लांब पल्ल्याच्या फ्लाइटदरम्यान दारूचे सेवन मर्यादित ठेवणे आणि पुरेसं पाणी पिणं योग्य ठरतं. विशेषतः लांब आंतरराष्ट्रीय प्रवासात शरीर हायड्रेट ठेवणं आणि पुरेशी विश्रांती घेणं आवश्यक असतं. (डिस्क्लेमर : वरील लेखात देण्यात आलेली माहिती ही प्राथमिक स्वरूपाची आहे. ती उपलब्ध स्रोतांवरून देण्यात आलेली आहे)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us