
पृथ्वीवरील भूकंपापेक्षा चंद्रावरील भूकंप निराळा असतो. दिल्ली-NCR मध्ये नुकताच भूकंप आला होता. परंतू चंद्रावरही भूकंप येत असतो. चंद्रावरील भूकंप पृथ्वीवरील भूकंपापेक्षा वेगळा असतो. येथे भूकंप येण्याची कारणे थोडी वेगळी असतात.अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाने १९६९ ते १९७७ दरम्यान अपोलो मोहिमेंतर्गत चंद्रावरील भूकंप रेकॉर्ड केला होता.

चंद्रावर भूकंप का येतो याची चार कारणे सांगितली जातात. पहिले कारण आहे पृथ्वीचे गुरुत्वीय बल. यास डीप मूनक्वेक (Deep Moonquakes) म्हणतात. दुसरे म्हणजे चंद्राच्या पृष्ठभागावरील ताण किंवा भेगा पडणे. अशा भूकंपाला शॅलो मूनक्वेक (Shallow Moonquakes) म्हणतात.

चंद्रावर दिवस आणि रात्र तापमानात मोठा फरक देखील भूकंपांना कारणीभूत बनतो.या प्रकारच्या भूकंपाला थर्मल मूनक्वेक (Shallow Moonquakes) म्हणतात.तर उल्कापात आणि अशनीच्या टक्करीमुळे होणाऱ्या भूकंपाला उल्कापिंड (Meteorite Impacts) प्रभाव म्हणतात.

भूकंपाने चंद्रावर किती नुकसान होत किंवा तो किती वेळ राहील याविषयी काही सांगता येत नाही. काही वेळा हा भूकंप मिनिटांत संपतो तर काही दहा मिनिटांपर्यंत राहातो. येथे कंपन कमी होते परंतू परिणाम जास्त होतात. त्याची तीव्रता जरी कमी असली तर त्याची ऊर्जा बराच काळ रहाते. भूकंपाने चंद्राच्या पृष्ठभागाला भेगा पडतात. पृष्ठभागावरील जमीन सरकते. (फोटो: Meta)

चंद्रावरील भूकंपाने भविष्यात अंतराळ स्थानकांना धोका पोहचू शकतो. जर चंद्रावर मनुष्यवस्ती झाली तर भूंकपाने या इमारतींना आणि मनुष्यांनाही धोका पाहोचू शकतो.एक गोष्ट तर स्पष्ट आहे की चंद्रावर असताना आपण भूकंपाच्या धोक्यापासून स्वत:ला वाचवू शकत नाही.(फोटो:Pixabay)

कसे समजले चंद्रावर भूकंप येता ? नासाने अपोलो मिशन दरम्यान पहिल्यांदा सांगितले होते की चंद्रावरही भूकंप येतो.अमेरिकन स्पेस एजन्सी NASA ने सीस्मोमीटर (भूकंप मापक यंत्र) द्वारे मूनक्वेक होत असल्याचे सिद्ध केले होते. (फोटो:Pixabay)