
इराणने आधीच सांगितलेलं आमच्यावर हल्ला झाला, तर उत्तर इतकं जोरदार असेल की, न्यू यॉर्क पर्यंत याचा परिमाण दिसून येईल. इराणने इस्रायलवर काल रात्री मिसाइल हल्ला करुन हे दाखवून दिलं. पण अमेरिका आणि इस्रायल या दोन सुपरपावर समोर इराण टिकू शकतो का?

वास्तवात अमेरिका, इस्रायलसमोर इराणची ताकद तशी फार नाहीय. अमेरिका, इस्रायल इतकी अत्याधुनिक शस्त्र त्यांच्याकडे नाहीयत. पण तरीही इराण अमेरिका आणि इस्रायल या दोन्ही देशांना नडतो, त्यांच्यासमोर झुकत नाही.

इराण अमेरिका आणि इस्रायलला इतका का नडतो? त्यांच्या शक्तीसमोर का हार मानत नाही. इराणकडे असं काय आहे? जे, तो एकाचवेळी दोन सुपरपावर्सना अंगावर घेतो, ते समजून घेऊया.

इराण इस्त्रायल युद्ध

इराणने सीरिया, इराक, येमेन आणि लेबनान सारख्या देशात प्रॉक्सी मिलिशिया म्हणजे दहशतवादी गट तयार केलेत. त्यांच्या मदतीने इराण थेट युद्धात उतरल्याशिवाय लढू शकतो.

इराणची सर्वात मोठी रणनितीक ताकद होरमुज जलडमरूमध्य आहे. इथून जगातील जवळपास 30 टक्के तेलाचा व्यापार चालतो. इराणने हे बंदर बंद केलं, तर तेलाचा पुरवठा ठप्प होईल. पेट्रोल-डिझेलच्या किंमती गगनाला भिडतील.

इराणचे चीन आणि रशिया या दोन्ही देशांसोबत मैत्रीपूर्ण संबंध आहेत. या दोन्ही देशांकडून इराणला शस्त्रास्त्र मिळत आहेत. म्हणजे इराण एकटा नाहीय, त्याला मजबूत पाठिंबा सुद्धा आहे.

इराणकडे जगातील सर्वात मोठं नैसर्गिक गॅस भंडार आहे. त्याशिवाय तांबा, जिंक आणि लोह मोठ्या प्रमाणात आहे. युद्ध झाल्यास या पुरवठ्यावर परिणाम होईल. जगाची अर्थव्यवस्था हलून जाईल.

सैन्य शक्तीमध्ये इराण अमेरिकेसमोर कुठेही टिकत नाही. पण त्यांनी सुद्धा स्वबळावर ड्रोन, मिसाइल्स विकसित केली आहेत. जी शत्रूच काही प्रमाणात निश्चित नुकसान करु शकतात

इराणच जागतिक नकाशावर जे भौगोलिक स्थान आहे तसच त्यांच्याकडे जी नैसर्गिक साधन संपत्ती आहे, त्या बळावर इराण आपल महत्त्व टिकवून आज अमेरिका आणि इस्रायलला भिडण्याची हिम्मत दाखवतोय.