
तुळशीला देवी लक्ष्मीचं स्वरुप मानलं गेलं आहे. देवी लक्ष्मी ही धनदेवता आहे. त्यामुळे घरात आर्थिक सुबत्ता यावी यासाठी तुळशीचं रोप लावलं जातं. इतकंच काय तर त्याची नियमित पूज केली जाते. कारण यात देवी लक्ष्मी वास करते. यामुळे घरात सुख समृद्धी येते.

भगवान विष्णुंना तुळस खूपच प्रिय आहे. त्यामुळे हरिप्रियाही संबोधलं जातं. भगवान विष्णुंना तुळशीपत्राशिवाय नैवेद्य पोहोचत नाही. ज्या घरात तुळस तिथे भगवान विष्णुंचा वास असतो.

वास्तुशास्त्रानुसार, तुळशीचं रोप सकारात्मक उर्जेचं स्रोत मानलं जातं. अंगणात तुळशीचं रोप असेल तर नकारात्मक ऊर्जा दूर होते. तसेच घरात सकारात्मक उर्जेचा संचार होतो. घरातील वातावरण शुद्ध आणि शांत राहतं.

पुराणानुसार, अंगणात तुळशीचं रोप लावल्याने आणि त्याची देखभाल केल्याने व्यक्तीच्या पूर्व जन्मातील पापं नष्ट होतात. तसेच मोक्षप्राप्तीचं माध्यम ठरतं असं मानलं जातं.

तुळशीचं रोप वास्तुदोष आणि पितृदोष दूर करण्यास मदत करते. अशुभ ग्रहांचा दोष कमी करण्यास मदते करते. मंगळ दोष आणि वास्तुदोषही दूर करते.

तुळशीत औषधीय गुणधर्मदेखील आहेत. आयुर्वेदात तूळस ही अमृततुल्य मानली गेली आहे. घरात तुळशीचं रोप असेल वातावरण शुद्ध राहतं. तुळशीचं पान खाल्ल्याने अनेक आजार दूर होण्यात मदत होते. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)