
आषाढी एकादशीचं विशेष महत्त्व सांगितलं गेलं आहे. या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेत जातात, अशी धर्मशास्त्र सांगतं. त्यामुळेच देवशयनी एकादशी म्हंटलं जातं. पुढचे चार महिने म्हणजे कार्तिक एकादशीपर्यंत भगवान विष्णू योग निद्रेत असतील.

आषाढ शुक्ल पक्षातील एकादशी देवशयनी एकादशीने ओळखली जाते. या दिवसापासून पुढचे चार महिने शुभ आणि मंगळ कार्य करण्यास मनाई असते.चार महिन्यानंतर देवउठनी एकादशीपासून शुभ कार्य सुरु होतात.

देवशयनी एकादशीपासून भगवान विष्णु आणि शालिग्रामची मनोभावे पूजा केली जाते. देवशयनी एकादशीला शाळिग्राम पूजेचं विशेष महत्व आहे.

या दिवशी शाळिग्रामचं पंचामृताने स्नान करावं. गंगाजलने अभिषेक करावा. तसेच पिवळं वस्त्र अर्पण करावं. शालिग्रामला श्रृंगार करावं. फूल, फळ, धूप, कापूर, नैवेद्य अर्पण अर्पण करावं. आरती करून पूजा समाप्त करावी.

शाळिग्रामला भोग अर्पण करण्यापूर्वी तुळशीपत्र नक्की टाका. कारण तुळशीपत्राशिवाय शाळिग्रामची पूजा अर्धवट मानली जाते. यासाठी विशेष काळजी घ्या. शालिग्राम आपल्या देव्हाऱ्यात स्थापित करा.

शाळिग्रामची पूजा नियमित केली पाहीजे. इतकंच काय तर शालिग्रामची योग्य काळजी घेतली पाहीजे. शाळिग्राम हा भगवान विष्णुंचं स्वरूप मानलं जातं. (सर्व फोटो- टीव्ही 9 हिंदी)