Rum Facts : लोक रम गरम पाण्यासोबत का पितात? खोकला खरंच कमी होतो? वाचा सत्य काय

रम गरम पाण्यात पिल्यावर खोकला राहतो, सर्दी राहते. यासह थंडीदेखील वाजत नाही, असा दावा केला जातो. परंतु हा दावा खरा आहे का? हे जाणून घेऊ या...

| Updated on: Feb 16, 2026 | 2:48 PM
1 / 5
आजकाल अनेक लोकांना वाटते की रम या मद्याला हिवाळ्यात गरम पाण्यासोबत पिल्यास थंडी कमी होते. तसेच खोकला, सर्दीदेखील कमी होते. तसे दावे केले जातात. त्यामुळे आता गरम पाण्यासोबत रम पिल्याने खरंच सर्दी, खोकला कमी होतो का, ते जाणून घेऊ या...

आजकाल अनेक लोकांना वाटते की रम या मद्याला हिवाळ्यात गरम पाण्यासोबत पिल्यास थंडी कमी होते. तसेच खोकला, सर्दीदेखील कमी होते. तसे दावे केले जातात. त्यामुळे आता गरम पाण्यासोबत रम पिल्याने खरंच सर्दी, खोकला कमी होतो का, ते जाणून घेऊ या...

2 / 5

थंडी वाढल्यावर गरम पाण्यात रम पिल्यानेही थंडी कमी होते, असे म्हटले जाते. रममध्ये अल्कोहोलचे प्रमाण असते. एका रमच्या बॉटलमध्ये साधारण 40 टक्के अल्कोहोल असते. रम पिल्याने खोकला, थंडी कमी होते, हा फक्त समज आहे. हा दावा अद्याप तरी कोणत्याही अभ्यासातून सिद्ध झालेला ननाही.

3 / 5

अनेक लोकांना वाटते की अल्कोहोल डिसइन्फेक्टंट आहे. त्यामुळे रमच्या माध्यमातू अल्कोहोल शरीरात गेल तर शरीरातील बॅक्टेरिया मरून जातात, असा दावा केला जातो. परंतु हा दावादेखील असत्य आहे. अल्कोहोल कधीकधी वस्तूंना डिसइन्फेक्टंट करण्यासाठी वापरले जाते. परंतु शरीरात ते डिसइन्फेक्टंट म्हणून काम कत नाही.

4 / 5

अनेक लोकेंना वाटते की रमचे सेवन केल्यास सर्दी थांबते. परंतु हा दावादेखील असत्य आहे. रमचे प्राशन केल्यास त्यातील अल्कोहोलमुळे लॉसोडिलेशन होते. म्हणजेच रक्तवाहिन्यांचा आकार वाढतो. यामुळे शरीरात आणखी अडचणी वाढू शकतात.

5 / 5

कफ सिरपमध्ये अल्कोहोल असते म्हणूनच खोकला थांबतो त्यामुळे रम पिल्यावरही खोकला थांबू शकतो असा दावा केला जातो. हा दावादेखील असत्य आहे. (टीप- मद्यप्रशानास प्रोत्साहन देण्याचा या स्टोरीचा उद्देश नाही. मद्य हे आरोग्यास हानिकारक आहे. मद्प्राशन करू नये.)

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us