Silver Chain : लोक चांदीची चेन गळ्यात का परिधान करतात? नेमकं लॉजिक काय?

चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र या दोन ग्रहांशी जोडला जातो. चंद्र हा मन, भावना आणि मानसिक स्थिरतेशी संबंधित आहे, असे मानले जाते. तर शुक्र प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुखांशी निगडीत आहे.

| Updated on: Nov 26, 2026 | 10:29 PM
1 / 5
भारतात सोनं जेवढं प्रसिद्ध आहे. तेवढाच मान चांदीच्या दागिन्यांना आहे. अनेकजण केवळ फॅशन किंवा आवड म्हणून गळ्यात चांदीची चेन घालतात. मात्र, ज्योतिषशास्त्रानुसार चांदी धारण करण्यामागे धार्मिक आणि ग्रहांशी संबंधित महत्त्व असल्याचे मानले जाते.

2 / 5

चांदीचा संबंध चंद्र आणि शुक्र या दोन ग्रहांशी जोडला जातो. चंद्र हा मन, भावना आणि मानसिक स्थिरतेशी संबंधित आहे, असे मानले जाते. तर शुक्र प्रेम, सौंदर्य, ऐश्वर्य आणि सुखांशी निगडीत आहे.

3 / 5

त्यामुळे चांदीची साखळी घातल्याने या ग्रहांचे शुभ परिणाम मिळू शकतात, अशी ज्योतिषशास्त्रात मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, कुंडलीत चंद्र कमजोर असल्यास व्यक्तीला मानसिक अस्वस्थता, सतत विचार करण्याची सवय, भावनिक चढ-उतार आणि झोपेच्या समस्या जाणवू शकतात.

4 / 5

शुक्राचा संबंध प्रेमसंबंध, वैवाहिक जीवन, सौंदर्य आणि सुख-सुविधांशी आहे. चांदी धारण केल्याने शुक्राचे सकारात्मक परिणाम मिळतात, असे मानले जाते. त्यामुळे वैवाहिक जीवनात आनंद, नात्यांमध्ये गोडवा आणि कला, फॅशन व ग्लॅमर क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रगती मिळू शकते.

5 / 5

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us