
धार्मिक मान्यतेनुसार, सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलार्पण करु नये. असं म्हणतात की, सूर्यास्तानंतर शिवलिंगावर जलार्पण अशुभ असतं.

हिंदू पुराणानुसार शिवलिंगावर सूर्यास्तानंतर विनामंत्र आणि दीवा न लावता जलार्पण करु नये. कारण ही वेळ भगवान शिव यांच्या विश्रांतीची असते.

संध्याकाळच्यावेळी शिवलिंगावर जलार्पणाला मनाई केली जाते. कारण कुठल्याही पूजेच्यावेळी सूर्यदेव साक्षीला असणं शुभ मानलं जातं.

संध्याकाळी सूर्य मावळलेला असतो. यावेळी शिवलिंगावर जलार्पण करण्याचा तुम्हाला विशेष लाभ मिळत नाही.

त्याशिवाय अमावस्येच्या तिथीला सुद्धा शिवलिंगावर जलार्पण करु नये. कारण या दिवशी चंद्रदेवाचे दर्शन होत नाहीत. याला अंधकाराचा प्रतीक मानलं जातं.