महिलांनी डाव नाकपुडी का टोचावी ? काय आहे कारण ?

अनेक संस्कृतींमध्ये, आणि विशेषतः भारतात, नाक टोचणे हा एक महत्त्वाचा विधी किंवा वैवाहिक परंपरेचा भाग आहे. महिलांसाठी ते का महत्त्वाचे मानले जात असे हे फार कमी लोकांना माहिती आहे.

| Updated on: Jun 27, 2025 | 12:29 PM
1 / 6
आजकाल बहुतांश महिलांचं नाक टोचलेलं दिसतं.  परंपरा आणि आपल्या संस्कृतीबद्दल बोलायचं झाल्यास कान किंवा नाक टोचणे हे फार पूर्वीपासून लोकप्रिय आहे. पूर्वीच्या काळात, पुरुष आणि स्त्रिया दोघेही कान टोचत असत. यासोबतच, जुन्या काळात महिलांसाठी नाक टोचणे अनिवार्य होते.

2 / 6
सजण्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले हे दागिने आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे होते. महिलांसाठी ते का महत्त्वाचे मानले जात होते हे फार कमी लोकांना माहिती आहे.

3 / 6
काही समाजांमध्ये, नाकातील नथ हे विवाहित असल्याचे प्रतीक आहे आणि शुभ प्रसंगी ते घालणे शुभ मानले जाते. काही मान्यतांनुसार, नाक टोचणे हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाची देवी मानली जाणारी देवी पार्वतीचा सन्मान करण्याचा एक मार्ग आहे. हे सोळा अलंकारांपैकी एक मानले जाते.

4 / 6
 आपण नाक किंवा कान टोचणे हा एक प्रकारचा सजावटीचा प्रकार मानू शकतो, परंतु त्यामागे विज्ञान आहे. खरं तर, वेद आणि धर्मग्रंथांमध्ये असे लिहिले आहे की नाक टोचल्याने महिलांना मासिक पाळीच्या वेदनांपासून आराम मिळतो. याशिवाय, प्रसूतीदरम्यान बाळाला जन्म देणे देखील खूप सोपं जातं असं मानलं जातं. तसेच यामुळे मायग्रेनच्या वेदनांपासूनही मोठ्या प्रमाणात आराम मिळतो.

5 / 6
आता अनेकांना असा प्रश्न पडतो की मुलींचे नाक फक्त डाव्या बाजूलाच का टोचले जाते? तुम्ही कधी याचा विचार केला आहे का? तर आज हे रहस्य जाणून घेऊया. खरंतर नाकाच्या डाव्या बाजूला असलेल्या काही नसा या आपल्या प्रजनन अवयवांशी संबंधित असतात. या भागाला टोचल्याने बाळंतपणाचा त्रास खूप कमी होतो.

6 / 6
काही लोक असेही म्हणतात की डाव्या कानाला टोचल्याने उच्च रक्तदाबासारख्या समस्यांपासून आराम मिळतो. नाक किंवा कान टोचणे कोणत्याही वयात करता येते. हे बालपणापासून प्रौढत्वापर्यंत कोणत्याही टप्प्यावर करता येते. याचा शरीरावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही.   ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही)