Knowledge : गोळ्यांचा रंग काळा, निळा, पिवळा का असतो? लॉजिक माहिती आहे का?

आपण आजारी असलो की अनेक गोळ्या घेतो. यातील काही गोळ्यांचा रंग वेगळा असतो. पण यामागे नेमके कारण काय आहे? याबद्दल अनेक लोकांना कल्पना नाही.

| Updated on: Oct 28, 2025 | 9:59 PM
1 / 6
कोणताही आजार झाला डॉक्टर आपल्याला औषध आणि गोळ्या घेण्याचा सल्ला देतात. डॉक्टरांनी सुचवलेल्या गोळ्या घेऊन नंतर आपण बरे होते. डॉक्टरांनी लिहून दिलेल्या बहुसंख्य गोळ्यांचा रंग पांढरा असतो.

2 / 6
पण काही गोळ्यांचा रंग पांढरा नसतो. काही गोळ्या या काल्या, लाल, पिवळ्या,  निळ्या रंगाच्या असतात. आपण कोणताही विचार न करता या गोळ्यांचे सेवन करतो. पण गोळ्यांचा रंग वेगवेगळा का असतो, याचा कधी विचार केला आहे का?

3 / 6
सगळ्या गोळ्यांचा रंग पांढराच असेल तर या गोळ्या घेताना रुग्णाची गफलत होऊ शकते. रुग्ण काही गोळ्या घेण्याचे विसरू शकतो. वृद्ध तसेच नीट पाहू न शकणाऱ्या रुग्णांच्या बाबतीत ही चूक होण्याची शक्यता जास्त असते.

4 / 6
यासोबतच वेदनाशामक, अँटी एग्झायटी, झोप येणाऱ्या गोळ्यांचा रंग निळा असतो. तर उर्जा वाढवणाऱ्या गोळ्यांचा रंग लाल असतो. निळा रंग पाहून मनाला शांती मिळते. तर लाल रंग पाहून उत्साही असल्यासारखे वाटते. याचाही विचार गोळ्या तयार करताना केला जातो.

5 / 6
काही गोळ्या उन्हामुळे खराब होतात. त्यामुळे त्यांच्यावर गडद रंगाने कोटिंग केली जाते. गोळ्यांची गुणवत्ता कायम राहावी यासाठीदेखील गोळ्यांना रंग दिला जातो.

6 / 6
(टीप- या स्टोरी ही इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीवर आधारलेली आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)