
एखादा गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी बेचव लागते असा अनुभव तुम्हाला नक्कीच आला असेल. चहा आणि कॉफीत साखर असूनही बेचव लागतो. मग प्रश्न असा पडतो की गोड पदार्थ खाल्ल्यावर बेचव लागण्याचं कारण काय? चला समजून घेऊयात..(फोटो:Pixabay )

गोड पदार्थ खाल्ल्यानंतर त्यावर चहा प्यायल्याने बेचव लागण्याचं कारण म्हणजे आपला मेंदू... आपल्या शरीतालील सर्व अंगांना मेंदूकडून सूचना मिळतात. त्या आधारावर शरीराची हालचाल होत असते. गोड खाल्ल्यानंतरही तसंच होतं. (फोटो:Pixabay )

जेव्हा आपल्या मेंदूला एक सारखेच संकेत मिळत असतील तर तो त्याकडे दुर्लक्ष करतो. मेंदू दुसऱ्या बदलांकडे लक्ष्य केंद्रीत करतो. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर चहा किंवा कॉफी बेचव लागते. (फोटो:Pixabay )

जेव्हा तुम्ही सतत गोड खाता तेव्हा गोड पदार्थ सामान्य होतात. मेंदू यातला फरक नोंदवत नाही. पण त्याच्या उलट काही खाल्लं तर मात्र मेंदूला त्याची चव कळते. जसं की गोड खाल्ल्यानंतर एखादी आंबट पदार्थ खाल्ला तर लगेच कळतं. (फोटो:Pixabay )

विज्ञानानुसार, इंद्रियांना आराम दिल्यानंतर मेंदू हळूहळू सामन्य होतो. त्यामुळे गोड पदार्थ खाल्ल्यानंतर काही वेळाने चहा प्यायला तर तो गोड लागतो. या पद्धतीने मेंदूवर चवीचा परिणाम होतो. (फोटो:Pixabay )