
वुमन्स टीम इंडिया आणि वुमन्स साऊथ आफ्रिका यांच्यात दुसरा वन डे सामना झाला. चिन्नास्वामी स्टेडियमवर हा सामना पार पडला. दोन्ही टीममधील दोन खेळाडूंनी शतके ठोकलीत.

या सामन्यात वुमन्स टीम इंडियाने प्रथन फलंदाजी करताना 325-3 धावा केल्या होत्या. यामध्ये स्मृती मंधानाने 120 चेंडूत 136 धावा केल्या. (18चौकार,02 षटकार) तर टीम इंडियाची कॅप्टन हरमनप्रीत कौरने 88 चेंडूत 103 धावा केल्या. (09 चौकार, 03 षटकार)

टीम इंडियाने दिलेल्या डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेनेही कडवी झुंज दिली. आफ्रिकेची कॅप्टन लॉरा वोल्वार्डने 135 चेंडूत 135 धावा (12चौकार, 3 षटकार) तर मारिझान कॅप हिने 94 चेंडूत 114 धावा केल्या. (11 चौकार, 03 षटकार)

क्रिकेटच्या इतिहासात या सामन्याची मोंद झाली आहे. कारण एकाच सामन्यात चार शतके पहिल्यांदाच केली गेली आहेत. त्यासोबतच दोन्ही संघांनी मिळून 646 धावा केल्या.

दरम्यान, वुमन्स टीम इंडियाने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 ने आघाडी घेतलेली आहे. तिसऱ्या सामन्यातही विजय मिळवत पाहुण्या आफ्रिकन संघाला व्हाईटवॉश देण्याचा प्रयत्न टीम इंडियाचा असणार आहे.