
पाणीपुरीच्या पाण्यातील इमली, पुदीना, कोथिंबीर, आणि काळे मीठ हे घटक पचन सुधारतात आणि गॅस, अॅसिडिटी कमी करण्यास मदत करतात. खारट-तिखट पाण्यामुळे तोंडाला चव येते आणि भूक वाढते.

पाणीपुरीचे पाणी ज्यामध्ये पुदीना, कोथिंबीर, चिंचेचं पाणी असलं, ज्यामुळे शरीरातील इलेक्ट्रोलाइट संतुलन राखण्यास मदत करते, विशेषतः उष्ण हवामानात.... अशात पाणीपुरी खाल्ल्याने शरीरास अनेक फायदे मिळतात...

मूग, चणे किंवा बटाटे यांचा वापर केल्यास शरीराला फायबर आणि काही प्रमाणात प्रथिने मिळतात, ज्यामुळे पचन चांगले राहतं. पुदीना, कोथिंबीर आणि चिंच यामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील हानिकारक फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात.

तेलकट पदार्थांच्या तुलनेत पाणीपुरीमध्ये कमी कॅलरी असतात. एवढंच नाही तर, आवड ता आणि चविष्ट पदार्थ खाल्ल्याने एंडॉर्फिन्स वाढतात. ज्यामुळे मन प्रसन्न राहते आणि ताण कमी होतो.

पण पाणीपुरी खाताना देखील काही गोष्टींची काळजी घ्या. रस्त्यावरच्या अस्वच्छ पाणीपुरीत जंतूंचा धोका असतो. तेल जुने किंवा दूषित असल्यास ती हानिकारक ठरू शकते.साखरयुक्त किंवा अतितिखट पाणीपुरी खाणं टाळलं पाहिजे.