
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये भारताला पहिला विश्व भारताला पहिला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या संघाचा कर्णधार कपिल देव यांच्या नावावर आहे. कपिल देवने ऑस्ट्रेलियाच्या 45 विकेट घेतल्या आहेत .

भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुसऱ्या स्थानावर असून शमीने 37 बळी घेतलेले आहेत. शमी वर्ल्ड कप संघामध्ये असल्याने त्याला वर्ल्डकपच्या साखळी सामन्यात संधी मिळते की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर आताचे बीसीसीआयचे प्रमुख आणि माजी गोलंदाज अजित आगरकर यांच्या नावावर आहे. आगरकर यांनी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 36 विकेट घेतल्या आहेत.

ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये चौथ्या स्थानी माजी गोलंदाज जगवाल श्रीनाख आहेत. जगवाल श्रीनाथ यांनी 33 विकेट घेतल्या आहेत.

कांगारूंविरूद्ध सर्वाधिक विकेट घेण्याच्या यादीमध्ये एकमेव स्पिनर हरभजन सिंह आहे. हरभजन सिंहने कांगारूंविरूद्ध वनडेमध्ये 32 विकेट घेतल्या आहेत.