
वन डे वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत पहिल्या क्रमांकावर न्यूझीलंड संघाचा मार्टिन गुप्टिल हा खेळाडू आहे. मार्टिन गप्टिल याने 2015 च्या वर्ल्ड कप मध्ये वेस्टइंडीज या संघाविरुद्ध 237 धावांची नाबाद खेळी करत इतिहास रचला होता.

या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर वेस्ट इंडीजचा घातक खेळाडू ख्रिस गेल असून 2015 च्या वर्ल्ड कप मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 215 धावांची खेळी केली होती. वन डे वर्ल्ड कपमध्ये द्विशतक ठोकणाऱ्या यादीमध्ये फक्त दोन खेळाडूंचा समावेश असून मार्टिन गप्टिल आणि दुसरा ख्रिस गेल आहे.

तिसऱ्या स्थानी दक्षिण आफ्रिकेचा माजी दिग्गज खेळाडू गॅरी क्रिस्टन असून त्याने 1996 च्या वर्ल्ड कपमध्ये UAE विरुद्ध 188 धावांची नाबाद खेळी केली होती.

भारताच्या एकमेव खेळाडूचा या यादीमध्ये समावेश आहे, तो खेळाडू दुसरा तिसरा कोणी नसून भारतीय संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आहे. सौरव गांगुली यांनी 1999 च्या वर्ल्ड कप मध्ये श्रीलंकेविरुद्ध 183 धावांची खेळी केली होती.

या यादीमध्ये पाचवा खेळाडू सर व्हिव्हियन रिचर्ड्स असून 1987 च्या वर्ल्ड कप मध्ये रिचर्ड्स यांनी 181 धावांची श्रीलंकेविरुद्ध धमाकेदार खेळी केली होती.