
बंदुक हे नाव ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर त्याची प्रतिकृती उभी राहते. आपण अनेकांनी फोटोत किंवा प्रत्यक्ष बंदूक पाहिली असेल. पण जगातील सर्वात मोठी बंदूक नेमकी कोणती होती? हे तुम्हाला माहिती आहे का? नाही ना... चला तर मग आज आपण त्याबद्दल जाणून घेऊया.

श्वेरर गुस्ताव असे जगातील सर्वात मोठ्या बंदुकीचे नाव आहे. ही जगातील सर्वात मोठी बंदूक होती जी जर्मनीने बनवली होती. या बंदुकीचा आकार इतका मोठा होता ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी ट्रेनचा वापर केला जायचा.

या बंदुकीची लांबी ४७.३ मीटर , रुंदी ७.१ मीटर, उंची ११.६ मीटर आणि वजन १३५० टन इतके होते. ही बंदूक आकाराने मोठी आणि जड वजनाची असल्याने ती चालवण्यासाठी तब्बल ५०० माणसे लागायची.

ही बंदूक श्वेरर गुस्ताव युद्धात वापरली गेली होती. ती जगातील सर्वात मोठी कॅलिबर गन असल्याचे म्हटले जाते. या बंदुकीद्वारे ४७ किलोमीटर अंतरापर्यंत ७ टन वजनाचे गोळे डागता येतात.

या बंदुकीची निर्मिती द क्रुप फॅमिली कंपनी या जर्मन कंपनीने केली होती. याच कंपनीने पहिल्या महायुद्धात बिग बर्था तोफांची निर्मिती देखील केली होती.

या तोफेची मारा क्षमता ४० किलोमीटर होती. या बंदुकीतून निघालेल्या गोळीचे वजन ७००० किलो होते.

ही जड तोफ पहिल्यांदा १९४२ मध्ये वापरली गेली. त्यावेळी या तोफेने सेवास्तोपोल पूर्णपणे उद्ध्वस्त झाले होते. या तोफेतून सुमारे ५० गोळ्या झाडण्यात आल्या. ज्यामुळे लाखो सोव्हिएत सैनिक ठार झाले होते.

हिटलर फ्रान्सचा नाश करण्यासाठी ही बंदूक बनवली होती. तो एकदा शस्त्रास्त्र कारखान्याला भेट देण्यासाठी गेला होता, या ठिकाणी त्याला फ्रान्सचा नाश करु शकेल, अशी बंदूक मागवली होती.

त्यानंतर हिटलरचा आदेश अंमलात आणला गेला. त्यानंतर १४ लाख किलो वजनाची बंदूक बनवण्यात आली.

श्वेरर गुस्ताव हे प्रभावी शस्त्र असलं तरी ते अपयशी झालं. त्याच्या अपयशामागे अनेक आश्चर्यकारक कारणे आहेत. हे तयार करण्यासाठी 1930 चे संपूर्ण दशक लागले. जेव्हा नाझींनी त्यांचे 'ब्लिट्झक्रीग' पश्चिम युरोपमध्ये सुरू केले तेव्हा ते तयार नव्हते.

दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे थोड्या गोळ्या झाडल्यानंतर सुमारे 250 लोकांना ते रिफिट करावे लागत होते. यात मोठ्या प्रमाणात वेळ खर्ची होत होता.