
आज आहे जागतिक मानसिक आरोग्य दिन. मानसिक आजार काय असतात? त्यावर उपाय काय? याविषयी माहिती देण्यासाठी हा दिवस दरवर्षी १० ऑक्टोबरला साजरा केला जातो. मानसिक आरोग्य सुधारायचं असेल तर प्रवास करणं, फिरायला जाणं हा उत्तम उपाय आहे.

ज्या लोकांच्या आयुष्यात खूप नैराश्य आलंय त्या लोकांनी आवर्जून फिरायला जावं. प्रवासात माणूस ताणतणावापासून दूर राहतो. रोज-रोज तेच रुटीन असेल तर माणसाला नैराश्य येऊ शकतं. ब्रेक घेऊन थोडं फिरायला गेलं की या ताणतणावापासून मुक्ती मिळू शकते.

रोगप्रतिकारशक्ती वाढते: माणूस जर आनंदी असेल तर त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढते. प्रवास आवडणारी व्यक्ती असो किंवा न आवडणारी असो, प्रवास व्यक्तीला टेन्शन पासून दूर ठेवते. या सगळ्याने माणूस आनंदी राहतो सहाजिकच रोगप्रतिकारशक्ती वाढते.

मनःशांती- निसर्गरम्य ठिकाणी गेलं की मन शांत होतं. धबधबे, नदी, डोंगर, थंडगार वारा हे सगळं पाहून मनाला शांती मिळते. धावपळीच्या जीवनात तुम्ही शांत वातावरणात जाऊन बसलात की मन शांत होते.

सकारात्मक विचार- प्रवासाचा सगळ्यात मोठा कुठला फायदा असेल तर तो आहे सकारात्मक विचार. प्रवास करताना आपण आपलं दैनंदिन टेन्शन, कामाचं टेन्शन, आपल्या नेहमीच्या आयुष्यापासून लांब असतो त्यामुळे आपण स्वतःवर लक्ष केंद्रित करू शकतो. कोणतीही चिंता नसल्याने मनात एक सकारात्मक ऊर्जा तयार होते.