Beautiful Currency: या आहेत जगातील 5 सर्वात सुंदर नोटा, भारताचा रुपया यादीत कुठे?
Prettiest Currency Notes: इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी नावाची एक संस्था आहे. ही संस्था दरवर्षी सर्व नोटांपैकी एक सुंदर नोटेची निवड करते. जगभरातील पाच सुंदर नोटा कोणत्या आहेत, हे तुम्हाला माहिती आहे का? भारताच्या नोटेचा क्रमांक या यादीत आहे का?

Prettiest Currency Notes: नोटा या केवळ अर्थकारणाचे वहन करत नाहीत. तर तिथली संस्कृती, इतिहास, पशु पक्षी आणि इतर अनेक गोष्टी आपल्याला सांगतात. नोटांची छपाई आणि सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. इंटरनॅशनल बँक नोट सोसायटी नावाची एक संस्था आहे. ती जगभरातील टॉप नोटांची यादी जाहीर करते.

ब्राझील या देशाची नोट ब्राझील रिअल (Brazilian Real) ही सर्वात सुंदर नोटांमध्ये टॉपवर आहे. या नोटेच्या एका बाजूला 'एफ़ीगी दा रिपब्लिका' छापलेली आहे. तर दुसर्या बाजूला सोनेरी वाघ आणि इतर प्राणी छापण्यात आलेला आहे.

युगांडा रिपब्लिकच्या चलनाचे नाव शिलिंग असे आहे. त्याचा कोड UGX ISO असा आहे. ही नोट बँक ऑफ युगांडाकडून चलनात आणण्यात आली आहे. यामध्ये जगप्रसिद्ध नील नदी आणि स्वतंत्रता स्मारक यासारखे प्रतिक आहे. देशाचा इतिहास आणि स्वाभिमान त्यातून दिसतो.

मलेशियाची नोट रिंगिट यापूर्वी मलेशियन डॉलर या नावाने ओळखली जायची. या नोटेचा कोड MYR आहे. रिंगिट बँक नेगारा याकडून ही नोट प्रसारित करण्यात येते. ही नोट तंत्रज्ञान, ऊर्जा आणि विकासाचे प्रतिक आहे.

स्वित्झर्लंडची ही नोट फिक्कट रंगाची आहे. तिच्या समोरील बाजूस एक हात दिसतो. त्यामधील तीन बोटं तीन डायमेन्शनकडे इशारा करतात. ते एका मोठ्या जमिनीच्या तुकडा दर्शवतात. ही एक वेगळी नोट या यादीत समाविष्ट आहे.

पाचव्या क्रमांकावर कॅनडाच्या डॉलरची नोट आहे. या नोटेचा रंग नारंगी दिसतो. वॉयला डेसमंडचा फोटो त्यावर छापण्यात आला आहे. तिने गोरेविरुद्ध काळे या भेदभावाविरोधात आवाज उठवला होता. कृष्णवर्णीय महिलांसाठी तिने आंदोलन केले होते. या नोटेनंतर रशियाची नोट आणि नंतर भारतीय नोटेचा समावेश आहे.