Snake : 9 फूट लांबून फेकतो विष, हा आहे जगातील सर्वात खतरनाक साप

Mozambique Spitting Cobra : साप दिसताच अनेकांचे पाय लटपट कापतात. जगात असा एक साप आहे जो 9 फूट अंतरावरून विष मानवाच्या डोळ्यात फेकू शकतो. या सापाचे नाव काय आहे? तो कुठे आढळतो याची सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

| Updated on: Dec 21, 2025 | 10:26 PM
1 / 5
विष फेकण्याची क्षमता : 9 फूट दूरवरून विष फेकणाऱ्या सापाचे नाव 'मोजाम्बिक स्पिटिंग कोब्रा' असे आहे. हा साप त्याच्या शत्रूवर किंवा भक्ष्यावर साधारणपणे 9 फुटांपर्यंत अंतरावरून विष फेकू शकतो. हे विष तो त्याच्या फणांमधील दातांच्या छिद्रांतून फवाऱ्यासारखे बाहेर फेकतो.

2 / 5
अचूक निशाणा : या सापाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा निशाणा. हा साप नेहमी समोरच्या प्राण्याच्या किंवा मानवाच्या डोळ्यांवर लक्ष केंद्रित करतो. विष फेकताना तो आपले डोके हलवतो जेणेकरून विष जास्तीत जास्त क्षेत्रावर पसरेल आणि डोळ्यांत जाईल.

3 / 5
डोळ्यांवर होणारा परिणाम : जर या सापाचे विष डोळ्यांत गेले, तर त्यामुळे प्रचंड जळजळ होते. वेळेवर उपचार न मिळाल्यास त्या व्यक्तीला कायमचे अंधत्व येऊ शकते. कारण हे विष डोळ्यांच्या पेशींना गंभीर इजा पोहोचवते.

4 / 5
विषाचा प्रकार : याचे विष प्रामुख्याने सायटोटॉक्सिक असते. हे विष त्वचेच्या पेशी आणि ऊतींना नष्ट करते, ज्यामुळे जखम होऊन तिथे सूज येते आणि शरीराचा तो भाग सडू लागतो.

5 / 5
शरीररचना : हे साप साधारणपणे 4 ते 6 फूट लांब असतात, परंतु काही प्रजाती अधिक मोठ्या असू शकतात. त्यांचा रंग राखाडी, तपकिरी किंवा काळपट असतो आणि फणा काढल्यावर ते अतिशय भयानक दिसतात. हा साप  आफ्रिका खंडात (मोझांबिक, दक्षिण आफ्रिका, टांझानिया) आणि आग्नेय आशियात (फिलीपिन्स, मलेशिया) आढळतो.