PHOTO | योजनेतून मिळालेल्या ट्रॅक्टरचे मॉडिफिकेशन, चाके काढून खास चाकं बसवल्याने शेतीतील खर्चात बचत

| Updated on: Jul 09, 2021 | 3:56 PM

यवतमाळमधील एका शेतकऱ्याने अशीच एक अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. यामुळे त्याला मोठा फायदाही झाला आहे.

1 / 7
जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही, असे आपल्याला लहानपणापासून शिकवले जाते. पण एखादी अशक्य गोष्ट प्रत्यक्षात उतरवणे तेवढेच कठीण असते.  यवतमाळमधील एका शेतकऱ्याने अशीच एक अशक्य गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. यामुळे त्याला मोठा फायदाही झाला आहे.

2 / 7
दिलेश परडखे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. ते यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यातील दिघी येथे राहतात. या शेतकऱ्याला राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतंर्गत लहान ट्रॅक्टर मिळाला होता. मात्र त्याने त्या लहान ट्रॅक्टरची चाके काढून त्याला खास चाकं बसवली आहेत.

3 / 7
ही चाके चिखलात रुतून बसत नाही. त्यामुळे या ट्रॅक्टरच्या सहाय्याने त्याला फवारणी करता येते. तसेच यामुळे त्याला शेतीतील खर्चात बचतही करता येते.

4 / 7
या शेतकऱ्याने ही चाकं खास कर्नाटकातून बनवून आणली आहेत. या चाकासाठी त्याला साधारण 80 हजारांचा खर्च आला.

5 / 7
सोयाबीन पीक मोठं झाल्यावर त्यात चालणे किंवा हाताने फवारणी करणे कठीण होते. मात्र या ट्रॅक्टरला उंच चाके असल्याने त्या ट्रॅक्टरचे ग्राउंड कॅलियरन्स 2 फुटाने वाढले आहे. यामुळे फवारणी करताना पिकांचे नुकसान होत नाही, असे या शेतकऱ्याचे म्हणणे आहे.

6 / 7
इच्छा तिथे मार्ग अशी म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. जर एखादी गोष्ट करण्याची आपली मनापासून इच्छा असेल तर आपण ती साध्यही करू शकतो. कुठलीही गोष्ट शक्‍य होते.

7 / 7
त्यानुसारच या शेतकऱ्याने युक्ती लावून हे काम केलं आहे. या कामामुळे त्याला भरघोस नफाही मिळू शकतो असे बोलले जात आहे.